शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: कोल्हापुरात उद्या बैठक, आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

By संदीप आडनाईक | Updated: December 23, 2023 17:42 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षण आंदोलनात शासनाला दिलेली २४ तारखेची मुदत संपत आल्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटलांनी २० ...

कोल्हापूर : मराठा आरक्षण आंदोलनात शासनाला दिलेली २४ तारखेची मुदत संपत आल्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटलांनी २० जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपाेषण करण्याची भूमिका जाहीर केली आहे, त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, दसरा चौकातील आंदोलन मंडपात सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाने व्यापक बैठक बोलावली आहे. दरम्यान, शनिवारी कोल्हापुर शहर रूग्णवाहिका सेवा संस्थेने रुग्णवाहिकांसह आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला.कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाने गेली ५४ दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु ठेवले. जरांगे पाटील यांच्या पुढील आदेशापर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शासनाला दिलेली मुदत संपल्याने साखळी धरणे आंदोलन रविवारपासून बंद करण्यात येणार असून यापुढील लढाई आता प्रत्यक्ष रस्त्यावर करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे. यासंदर्भात जरांगे पाटील यांचे आदेश आल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे कोल्हपुरातील समन्वयकांनी ठरवले आहे. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे.दसरा चौकात शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदुलकर, प्रा. अनिल घाटगे, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, शशिकांत पाटील, शैलजा भोसले यांनी सकल मराठा समाजाची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, या आंदोलनाची व्यापकता वाढविण्यासाठी मराठा समाजातील सदस्यांनी, त्यांच्या लेकरे-बाळांच्या भवितव्याचा विचार करुन, तसेच संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांना पाठिंबा व्यक्त करण्याकरिता मोठ्या संख्येने दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे.रुग्णवाहिका दसरा चौकातकोल्हापुरातील धरणे आंदोलनस्थळाला शनिवारी कोल्हापूर शहर रूग्णवाहिका सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी अनेक रुग्णवाहिकांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती प्रदक्षिणा घातल्या. संस्थेचे गणेश पाटील, अजित ढवण, नौशाद बारगीर, प्रशांत पाटील, अनिल घोरपडे, रवि कांबळे, सुंदर कणसे, वसिम तहसिलदार, केदार आंमले, सागर शिंदे, महेंद्र माने, निरंजन दुर्गळे, सुरज नाईक, शिवाजी रावळ, चंदू चौगुले, फिरोज सय्यद, अनिल कांबळे, कमला परिट यांनी संस्थेचे सेक्रेटरी रवि घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण