पन्हाळा तालुक्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:31+5:302021-06-17T04:17:31+5:30

तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी विशेष सूचना दिल्याने तातडीच्या बैठकीचे आयोजन केल्याचे समजून आले. यात गृहअलगीकरण ...

Meeting to reduce the growing number of corona patients in Panhala taluka | पन्हाळा तालुक्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी बैठक

पन्हाळा तालुक्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी बैठक

तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी विशेष सूचना दिल्याने तातडीच्या बैठकीचे आयोजन केल्याचे समजून आले. यात गृहअलगीकरण न करणे, रुग्ण संपर्क शोध मोहीम, लसीकरण व सर्व माहिती अद्ययावत ठेवणे यावर भर देण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी अनिल कवठेकर यांनी सध्या ४८५ कोरोना रुग्ण सक्रिय असल्याचे सांगितले. सध्या सक्रिय रुग्ण संजीवन व पोर्ले येथे ठेवले असून या ठिकाणी आॕॅक्सिजनसह औषधांची चांगली सोय ठेवली असून रुग्णांच्या पहिल्या संपर्कातील लोकांना त्यांचे घरीच ठेवले असल्याचे सांगितले. ही रुग्णसंख्या कमी करण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे डाॕॅ. कवठेकर यांनी सांगितले.

आजच्या विशेष बैठकीत सर्वच शासकीय वरिष्ठ हजर होते. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांनी सांगितले.

Web Title: Meeting to reduce the growing number of corona patients in Panhala taluka