निधी संकलन अभियानासंदर्भात रामसेवकांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:31+5:302021-01-13T05:01:31+5:30
इचलकरंजी : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे निर्माण कार्य सुरू आहे. यासाठी जनतेच्या सहभागातून निधी संकलन मोहीम दिनांक १५ जानेवारी ...

निधी संकलन अभियानासंदर्भात रामसेवकांचा मेळावा
इचलकरंजी : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे निर्माण कार्य सुरू आहे. यासाठी जनतेच्या सहभागातून निधी संकलन मोहीम दिनांक १५ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी शहर व ग्रामीण परिसरातील सर्व रामसेवकांचा मेळावा विहिंप व बजरंग दलाच्यावतीने सिंधी पंचायत येथे घेण्यात आला. यावेळी बाळ महाराज उर्फ संतोष कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी विहिंपचे जिल्हा कार्याध्यक्ष पंढरीनाथ ठाणेकर यांनी मंत्रपठण केले. प्रवीण सामंत यांनी प्रास्ताविक केले. अक्रूर हळदे व किशोर मोदी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सनतकुमार दायमा, संतोष मुरदंडे, जितेंद्र मस्कर, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुकेश दायमा यांनी केले तर बाळासाहेब ओझा यांनी आभार मानले.