कामगार मंडळासाठी आज मंत्रालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:19+5:302021-01-08T05:21:19+5:30
कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. त्यासंदर्भात आमदार आवाडे यांनी पाठपुरावा सुरू केला ...

कामगार मंडळासाठी आज मंत्रालयात बैठक
कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. त्यासंदर्भात आमदार आवाडे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याप्रकरणी बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी १३ डिसेबर २०२० ला पत्र देऊन मंत्री वळसे-पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार ही बैठक आयोजित केली आहे. राज्यात वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांना माथाडी कामगार मंडळाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात कल्याणकारी मंडळ स्थापन करून योजना राबवाव्यात, याबाबत चर्चा होणार आहे. यापूर्वीच्या सरकारने निर्णय घेतला होता. परंतु प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आवाडे यांनी केली आहे. बैठकीस कामगार विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त, आदींसह संबंधित अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे.