कुरुंदवाड शेतकरी फळे खरेदी-विक्री संस्थेची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:45+5:302021-03-27T04:24:45+5:30
कोरोनामुळे संस्थेच्या दहाव्या वार्षिक ऑनलाइन सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थावरून ते बोलत होते. पाटील म्हणाले, संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असून अवघ्या ...

कुरुंदवाड शेतकरी फळे खरेदी-विक्री संस्थेची सभा
कोरोनामुळे संस्थेच्या दहाव्या वार्षिक ऑनलाइन सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थावरून ते बोलत होते. पाटील म्हणाले, संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असून अवघ्या दहा वर्षात संस्थेने स्वत:ची इमारत व गोडावूनसाठी जागा घेतली आहे. सभासदांना उच्चांकी १५ टक्के बोनस वाटप करत सहकाराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिव बी.एस. पाटील यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केल्यानंतर सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. यावेळी जेष्ठ संचालक जिनगोंडा पाटील, किरण आलासे, आण्णासो गुदले, अजित पाटील, कलगोंडा पोमाजे, रावसाहेब उगारे, धोंडीराम चौगुले, श्रीकांत शिरगुप्पे, कल्लाप्पा कोईक उपस्थित होते.
फोटो - २६०३२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील शेतकरी सहकारी फळे खरेदी विक्री संस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष दादासो पाटील यांनी मार्गदर्शन केले.