आलासच्या कृष्णा पाणीपुरवठा संस्थेची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:11+5:302021-02-05T07:01:11+5:30
बुबनाळ : आलास (ता. शिरोळ) येथील कै. आलमखान पठाण कृष्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेची ५४ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात ...

आलासच्या कृष्णा पाणीपुरवठा संस्थेची सभा
बुबनाळ : आलास (ता. शिरोळ) येथील कै. आलमखान पठाण कृष्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेची ५४ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत पीकवार पाणीपट्टी दराला संचालक मंडळाने दिलेल्या शिफारशीसह अन्य विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नासर पठाण होते.
प्रारंभी स्वागत अध्यक्ष पठाण यांनी केले तर प्रास्ताविक तानाजी कदम यांनी करुन संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. सचिव रामचंद्र म्हैशाळे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी २०२०-२१साठी संचालक मंडळाने शिफारस केलेल्या पीकवार पाणीपट्टी दराला मंजुरी देणे, उत्पन्न खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे यासह विविध विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी उपाध्यक्ष बिराप्पा गावडे, संचालक मुजमिल पठाण यांच्यासह सभासद उपस्थित होते.
चौकट - सभेत पोलीस बंदोबस्त
संस्थेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी असलम मखमल्ला यांच्यासह ७८ सभासदांना सहाय्यक निबंधक कार्यालयाने मंजुरी दिल्याने त्यांनी या सभेला उपस्थित राहात सभासदांचे प्रश्न मांडले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.