शुल्क आकारणीबाबत मुख्याध्यापक-संस्थाचालकांची बैठक घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:18+5:302021-03-27T04:25:18+5:30
कोल्हापूर : शालेय शुल्क आकारणी, परीक्षा, शैक्षणिक वर्षाचा समारोप आदींबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती ...

शुल्क आकारणीबाबत मुख्याध्यापक-संस्थाचालकांची बैठक घेणार
कोल्हापूर : शालेय शुल्क आकारणी, परीक्षा, शैक्षणिक वर्षाचा समारोप आदींबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना शुक्रवारी दिले. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावर शुल्क आकारणीबाबत मुख्याध्यापक, संस्थाचालकांची बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही सोनवणे यांनी दिली.
यावर्षी इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग चालू झालेले नाहीत. याबाबत अंतिम निर्णय काय असणार आहे. इयत्ता पाचवी ते नववीचे वर्ग फेब्रुवारीपासून सुरू झाले. या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की त्यांना पुढील वर्गात पाठविण्यात येणार आहे. बालवाडी ते इयत्ता चौथीचे वर्ग चालू झालेले नाहीत. तरीही काही शाळा या पालकांकडे शुल्काची मागणी, वसुली करत आहेत. याबाबत शासनाची भूमिका काय आहे? पुढील शैक्षणिक वर्षाबाबत काय नियोजन आहे. शैक्षणिक धोरणाचे जाहीर स्पष्टीकरण करून गोंधळाची स्थिती दूर करावी, अशी मागणी या समितीच्या शिष्टमंडळाने केली. त्यावर परीक्षा, शैक्षणिक वर्षाचा समारोप, नवीन वर्षाची सुरुवात, आदींबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळात रमेश मोरे, अशोक पोवार, भाऊ घोडके, राजेश वरक, चंद्रकांत पाटील, लहू शिंदे, किशोर घाटगे, कादर मलबारी आदींचा समावेश होता.
कृती समितीने केलेल्या सूचना
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गडकोट किल्ल्यांवर शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे.
विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा सामुदायिक मासपेटीचा तास घ्यावा.
शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे.
फोटो (२६०३२०२१-कोल-कृती समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी शालेय क्षेत्राबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर शहर नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले.
===Photopath===
260321\26kol_3_26032021_5.jpg
===Caption===
फोटो (२६०३२०२१-कोल-कृती समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी शालेय क्षेत्राबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर शहर नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले.