हद्दवाढ समितीसोबत उद्या पालकमंत्र्यांची बैठक

By Admin | Updated: May 4, 2016 00:50 IST2016-05-04T00:15:32+5:302016-05-04T00:50:21+5:30

आर. के. पोवार : उपस्थित राहण्याचे आवाहन

Meeting with Guardian Minister tomorrow with the Extradition Committee | हद्दवाढ समितीसोबत उद्या पालकमंत्र्यांची बैठक

हद्दवाढ समितीसोबत उद्या पालकमंत्र्यांची बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्या, गुरुवारी दुपारी अडीच वाजता शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलविली आहे. या बैठकीस सर्वपक्षीय हद्दवाढ समितीशी चर्चा करण्यात येणार आहे.
हद्दवाढीमध्ये दोन्हीही एम.आय.डी.सीं.चा समावेश व्हावा, यासाठी हद्दवाढ कृती समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.शासनाने हद्दवाढप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली असून, सुरुवातीस २० गावांचा समावेश करण्याच्यादृष्टीने शासन दरबारी हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये गोकुळ शिरगाव आणि शिरोली या दोन एमआयडीसींचा समावेश व्हावा, यासाठी चर्चा करण्याच्यादृष्टीने या बैठकीस उपस्थित राहावे, असेही आवाहन आर. के. पोवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)


राज्याचे सहकारमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्या, गुरुवारी शहराच्या हद्दवाढप्रश्नी सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीला निमंत्रित केले आहे.
शासनाने हद्दवाढप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली असून, सुरुवातीस २० गावांचा समावेश करण्याच्यादृष्टीने शासन दरबारी हालचाली सुरू आहेत.

Web Title: Meeting with Guardian Minister tomorrow with the Extradition Committee