बांधकाम कामगारांचा २ फेब्रुवारीला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:14+5:302021-01-17T04:21:14+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने २ फेब्रुुवारी रोजी सकाळी ११ ते ३ पर्यंत येथील ...

बांधकाम कामगारांचा २ फेब्रुवारीला मेळावा
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने २ फेब्रुुवारी रोजी सकाळी ११ ते ३ पर्यंत येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित केला आहे. बांधकाम कामगारांंच्या ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन नोंदणीच्या मागणीसह विविध मागण्यांबाबत मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे शंकर पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुजारी म्हणाले, आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून बांधकाम कामगारांवर सातत्याने अन्याय केला आहे. कामगारांना अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठीच्या पाच हजार रुपयांची योजना बंद केली, योजना बंद होण्यापूर्वी हे पाच लाख कर्ज मंजूर झालेल्या कामगारांना ते मिळालेले नाही. शिवाय देशातील इतर राज्यांप्रमाणेच बांधकाम कामगारांना मुलींच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये देण्याचा कल्याणकारी मंडळाने निर्णय घेतला. पण वर्षानंतरही ते मिळालेले नाही. अशा विविध मागण्यांबाबत शासनाने दुजाभाव दाखवला आहे, त्यासाठी बांधकाम कामगारांचा राज्यव्यापी मेळावा शाहू स्मारक भवनमध्ये होत आहे. त्या मेळाव्यास कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पुजारी यांनी केले आहे.
यावेळी मिश्रालाल जाजू, के.पी. पाटील, ज्योतिराव मोरे, आंनंदा गुरव, राजेंद्र निकम, मदन मुरगुडे, धनाजी गुरव आदी उपस्थित होते.