आयसोलेशन कोविड सेंटरला औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST2021-04-25T04:23:26+5:302021-04-25T04:23:26+5:30
या संदर्भात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोल्हापुरातील उद्योगपती, सामाजिक संस्था व नागरिकांस महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी ...

आयसोलेशन कोविड सेंटरला औषधे
या संदर्भात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोल्हापुरातील उद्योगपती, सामाजिक संस्था व नागरिकांस महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन उद्योजक दत्तात्रय पाटील व उद्योजिका डॉ. सुमित्रा प्रताप भोसले यांनी महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी औषधे दिली. यात २४०० टॅब व्हिटॅमीन, ९०० टॅब्लेट मॅक्समेल्ट या औषधांचा समावेश आहे. यावेळी विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर व आयासोलेशन रुग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
फोटो : २४०४२०२१-कोल-आयसोलेशन
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या आयसोलेशन कोविड सेंटरला उद्योजक दत्तात्रय पाटील व उद्योजिका डाॅ. सुमित्रा भोसले यांनी कोरोनावरील औषधे भेट दिली. ही औषधे डाॅ. रमेश जाधव यांनी स्वीकारली. यावेळी डाॅ. अर्पिता खैरमोडे, राहुल राजगोळकर उपस्थित होते.