मोकळ्या जागेत मेडिकल वेस्ट; हॉस्पिटलकडून ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:25 IST2021-05-18T04:25:54+5:302021-05-18T04:25:54+5:30

आज, सोमवारी दुपारी शिवसेना शहराध्यक्ष व नगरसेवक संदीप पाटील यांच्याकडे नागरिकांनी मेडिकल वेस्टबाबत तक्रार केली होती. कार्यकर्त्यांनी ...

Medical waste in open space; 50,000 fine from hospital | मोकळ्या जागेत मेडिकल वेस्ट; हॉस्पिटलकडून ५० हजारांचा दंड

मोकळ्या जागेत मेडिकल वेस्ट; हॉस्पिटलकडून ५० हजारांचा दंड

आज, सोमवारी दुपारी शिवसेना शहराध्यक्ष व नगरसेवक संदीप पाटील यांच्याकडे नागरिकांनी मेडिकल वेस्टबाबत तक्रार केली होती. कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी हाॅस्पिटलने पाठीमागच्या बाजूला बायोमेडिकल वेस्ट ठेवले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी भूमिका घेतली. पालिकेच्या आरोग्य विभागातील प्रमुखांना बोलावून जागेचा पंचनामा करण्यास भाग पाडले. आरोग्य विभागाचे उदयकुमार डोंगरे, संदीप धनवडे,सुरेश भोपळे आदी उपस्थित होते तसेच ५० हजार दंडाची कारवाई करण्यात आली. दोन दिवसांपासून हॉस्पिटल प्रशासन व शिवसेना यांच्यात एका रुग्णाच्या बिलावरून वाद सुरू होता.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष पाटील म्हणाले की, स्थानिक नागरिकांना बायो मेडिकल वेस्टमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आम्ही पालिकेस कारवाई करण्याची सूचना केली तसेच शहरातील वाढीव बिलांबाबत तक्रारी असतील तर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

हाॅस्पिटलच्यावतीने डाॅ. सूरज कुडाळकर यांनी खुलासा केला. मेडिकल वेस्ट बॅगमध्येच भरून ठेवण्यात आले होते. चक्रीवादळामुळे हा थोडा कचरा अस्ताव्यस्त झाला असेल. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो तसेच बिलाबाबत एकच बाजू ऐकून घेऊन आमची बदनामी करण्यात येत आहे.या आरोपांमुळे आमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.

यावेळी बबलू खाटिक, तोसिफ खाटिक, शिवराज मुसळे, रोहन तुनगार, विशाल पाटील, रितेष तषासे आदी उपस्थित होते. दरम्यान, या दंडाबाबत हाॅस्पिटलने हरकत घेतली आहे. त्यामुळे निर्णय प्रलंबित राहिला आहे.

फोटो कॅप्शन : पेठवडगाव: येथील कुडाळकर हाॅस्पिटलला बायो मेडिकल वेस्टचा साठा केल्याप्रकरणी पालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Web Title: Medical waste in open space; 50,000 fine from hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.