शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय पथकाची कार्यतत्परता; ऊसतोड कामगारांना रात्री भरपावसात खोपेवर जावून दिली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 14:07 IST

शिरोली : दिवसभर उसाच्या फडात असणारे ऊसतोड कामगार लसीपासून वंचित राहू नयेत, यासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने ...

शिरोली : दिवसभर उसाच्या फडात असणारे ऊसतोड कामगार लसीपासून वंचित राहू नयेत, यासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने भरपावसात त्यांच्या खोपेवर जात त्यांना लस दिली. वैद्यकीय पथकाने दाखविलेल्या या कार्यतत्परतेचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही अभिनंदन केले आहे.शिरोली परिसरात सध्या ऊस कामगारांनी तळ ठोकला आहे. शिरोलीसह नागाव, हालोंडी, मौजे वडगाव, टोप, संभापूर, कासारवाडी या गावात ऊसतोड मजूर आले आहेत. हे कामगार दिवसभर फडात असतात. सायंकाळी सातनंतरच ते आपल्या खोपेवर येतात. त्यामुळे त्यांना लस देण्यात अडचणी येत होत्या. शेवटी या कामगारांना सायंकाळी सातनंतर खोपीवर जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युज यांनी घेतला.

बुधवारी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक त्यांच्या खोपेवर जात असतानाच पाऊस आला. मात्र, या कामगरांना लस देणे गरजेचे असल्याने या पथकाने भरपावसात सायंकाळी सातनंतर कामगारांच्या खोपेवर जाऊन त्यांना लस दिली. शिरोली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने दाखविलेल्या कार्यतत्परतेचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी अभिनंदन केले. लसीकरणासाठी डॉ. पंकज पाटील, आरोग्यसेवक अभिजित शिंदे, परवेज काजी, एस.आर.कांबळे, सालोमन कदम, विद्या पाटील, सरदार पाटील यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshirol-acशिरोळCorona vaccineकोरोनाची लसSugar factoryसाखर कारखाने