गडमुडशिंगीत कोविड सेंटरला वैद्यकीस साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:24 IST2021-05-27T04:24:33+5:302021-05-27T04:24:33+5:30
कोरोना पेशंटचे वाढते प्रमाण पाहून गडमुडशिंगी येथे कोविड सेंटर लोकसहभागातून सुरू केले आहे. त्या ...

गडमुडशिंगीत कोविड सेंटरला वैद्यकीस साहित्य
कोरोना पेशंटचे वाढते प्रमाण पाहून गडमुडशिंगी येथे कोविड सेंटर लोकसहभागातून सुरू केले आहे. त्या सेंटरसाठी लागणारे पी.पी.ई. कीट, सॅनिटायझर, ग्लोज, ऑक्सिमीटर, मास्क, क्लीनर, थर्मल मशीन, असे साहित्य जिल्हा परिषद सदस्या पाटील यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी पं. स. सदस्य प्रदीप झांबरे, विजय पाटील, सचिन पाटील, ग्रा.पं. सदस्य रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, रविराज सोनुले, दिलीप थोरात, संतोष कांबळे, पिंटू सोनुले, आनंद बनकर, उत्तम शिंदे, दत्ता नेर्ले, सुकुमार देशमुख, बागल कांबळे, संदीप गौड, आदी उपस्थित होते.
फोटो : २३ गडमुडशिंगी मदत
गडमुडशिंगी येथील कोविड सेंटरला जि. प. च्या माध्यमातून वैद्यकीय साहित्य देण्यात आले. यावेळी जि. प. सदस्या वंदना पाटील, विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी आर. एन. गाढवे, प्रदीप झांबरे व ना. बंटी पाटील ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.