शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Kolhapur: मंत्री मुश्रीफ यांना गडहिंग्लजमध्ये ‘बालेवाडी’ साकारायचीय, पण..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:17 IST

महत्त्वाकांक्षी क्रीडा संकुल : जागेच्या मालकीअभावी मैदानाच्या विकासात अडथळे

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लजमध्ये बालेवाडीच्या धर्तीवर सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याचा संकल्प वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोडला आहे. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे २ कोटींच्या निधीतून मैदान विकासाचे काम सुरू आहे. परंतु, ‘त्या’ जागेची मालकीच अद्याप निश्चित न झाल्यामुळे त्यात अडथळे येत आहेत.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या प्रयत्नामुळे येथील वडरगे रोडवरील एम. आर. हायस्कूलच्या शेतीशाळेची १० एकर जागा उपलब्ध झाली आहे. याचठिकाणी सुमारे ५० कोटींचे भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा मानस मुश्रीफ यांनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे. परंतु, अद्याप जागेची मालकीच निश्चित न झाल्यामुळे कायदेशीर व तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत.

'फुटबॉल'ची पंढरी म्हणून सर्वदूर ओळख असणाऱ्या गडहिंग्लज शहरासह तालुक्याला वैभवशाली क्रीडा परंपरा आहे. परंतु,सरकारी मैदान उपलब्ध नसल्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शासकीय क्रीडा स्पर्धा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी घ्याव्या लागतात. फुटबॉलचे राष्ट्रीय सामने येथील एम.आर.हायस्कूलच्या मैदानावरच होतात.त्यामुळे सुसज्ज क्रीडा संकुलाची गरज आहे.

जि. प.ची जागा सरकार हक्कात?करवीर संस्थानकडून मिळालेल्या जमिनीत पूर्वी जिल्हा परिषदेच्या एम. आर. हायस्कूलची शेतीशाळा होती. गडहिंग्लज शहरातील ‘प्राईम लोकेशन’च्या या जागेवरच हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. दरम्यान, ‘महसूल’च्या फेरफारात या जागेला सरकारचे नाव लागले असून, त्याठिकाणी जिल्हा परिषदेचे नाव लावणे आवश्यक आहे.

वृक्षतोड परवानगीसाठी हेलपाटे !नियोजित क्रीडा संकुलाच्या जागेवरील निलगिरीची झाडे तोडणे, विजेचे खांब स्थलांतरित करण्यासाठी ज्येष्ठ फुटबॉलपटू अर्जुन चौगुले, आण्णाप्पा गाडवी, अरविंद बारदेस्कर यांनी धडपड केली. परंतु, सागवानच्या जुन्या वृक्षतोडीच्या परवानगीसाठी नगरपालिका, वन विभाग व महसूलकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.

फुटबॉल मैदान पूर्ण.. धावपट्टी अपूर्ण..!फुटबॉल मैदानाचे काम पूर्ण झाले असून, वृक्षतोडीअभावी ४०० मीटर धावपट्टीचे काम अर्धवट राहिले आहे. कब्बड्डी, व्हॉलीबॉल व खो-खो या खेळांची मैदानेही तयार केली जाणार आहेत. फेब्रुवारीअखेर ही कामे पूर्ण होतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आदित्य भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ