मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज आज प्रात्यक्षिक : १६ मे रोजी दुपारपर्यंत निकाल स्पष्ट
By Admin | Updated: May 9, 2014 00:28 IST2014-05-09T00:28:18+5:302014-05-09T00:28:18+5:30
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख जवळ येईल, तशी जिल्हा प्रशासनाची तयारी वेग घेत आहे. मतमोजणीची तयारी

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज आज प्रात्यक्षिक : १६ मे रोजी दुपारपर्यंत निकाल स्पष्ट
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख जवळ येईल, तशी जिल्हा प्रशासनाची तयारी वेग घेत आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण होत आली असून, १६ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा जिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले यांनी व्यक्त केली. दरम्यान, उद्या (शुक्रवार) प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १६ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीचे कागदोपत्री नियोजन पूर्ण झाले असून, आता फक्त कर्मचार्यांना प्रशिक्षण व रंगीत तालीम बाकी राहिली आहे. कोल्हापूर व हातकणंगले या दोन मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबले लावली जाणार आहेत. म्हणजेच एकूण १६८ टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी सुरू होईल. त्या हिशेबाने प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी याप्रमाणे ५०४ क र्मचारी या प्रक्रियेत भाग घेतील. मतमोजणीच्या कमीत कमी २४, तर जास्तीत जास्त २९ फेर्या होणार आहेत. एक फेरी ही दहा ते बारा हजारांची असणार आहे. पहिल्या टप्प्यात टपालाने येणार्या मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीपर्यंत ज्या मतपत्रिका येतील, त्या मोजण्यात येणार आहेत. या मतपत्रिका मोजल्यानंतर मग इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे खोलली जातील. एका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर साधारण एक हजार ते बाराशे मतदान गृहीत धरण्यात आले आहे. पोस्टाने येणार्या मतपत्रिकांचे विभाजन करणे आणि मोजणी करणे याला उशीर होणार असल्याने निकाल हा दुपारी तीन वाजेपर्यंत लागेल.