पोलिसांसह कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:33+5:302021-04-30T04:30:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अविरत सेवा बजावणाऱ्या पोलीस, गृहरक्षक दल, महापालिका कर्मचाऱ्यांना छत्रपती उदयनराजे भोसले ...

पोलिसांसह कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना भोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अविरत सेवा बजावणाऱ्या पोलीस, गृहरक्षक दल, महापालिका कर्मचाऱ्यांना छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठान व शिवप्रेमी मित्रमंडळ, फ्रेंड्स तरुण मंडळ आणि आदित्य भोसले युवा मंचच्या वतीने भोजनाची पॅकेट देण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी करण्यात आली.
शहराच्या विविध ठिकाणी बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, महापालिका कर्मचारी व विविध रुग्णालयांमध्ये असणाऱ्या रुग्णांना भोजनाचे पॅकेट व पाणी वितरण प्रतिष्ठानच्या वतीने मोजक्याच सदस्यांचा उपस्थितीत करण्यात आले. ज्या रुग्णांना भोजनाची सोय नाही, अशा रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाइकांनी संपर्क साधल्यास त्यांची मोफत जेवणाची सोय प्रतिष्ठानतर्फे केली जाणार आहे.
यावेळी मयूरेश भोसले, शैलेश जाधव, रंजन नलावडे, अमित भोसले, संजय देसाई उपस्थित होते. ज्या रुग्णांना वैद्यकीय मदत हवी असल्यासही त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी प्रतिष्ठाच्या कार्यकर्त्यांशी संर्पक साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
२९०४२०२१-कोल-उदयनराजे
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अविरत सेवा बजावणाऱ्या पोलिस, गृहरक्षक दल, महापालिका कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठान, शिवप्रेमी मित्रमंडळ, फ्रेंड्स तरुण मंडळ आणि आदित्य भोसले युवा मंचच्या वतीने गुरुवारपासून भोजनाची पॅकेट देण्यात आली.