शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

लंडनमध्ये वादळाने वीज खंडित झाल्यावर जेवण, राहण्याचे पॅकेज, अन् कोल्हापुरात दिवसा विजेसाठी रात्र रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 13:00 IST

झुणका भाकर खाऊन राजू शेट्टी यांच्यासह आंदोलनकर्ते शेतकरी महावितरणच्या दारातच झोपी गेले. हा फोटो दिवसभर सर्वत्र व्हायरल झाला.

कोल्हापूर : लंडनमध्ये वादळ झाल्यामुळे चार दिवसांपासून वीज बंद असल्याने तेथील कंपनीने वीज येईपर्यंत संबंधित भागातील नागरिकांना जेवण आणि राहण्यासाठी हॉटेलचे पॅकेज दिले आहे, पण इकडे कोल्हापुरात घर पाच महिन्यांपासून बंद आहे, तरीही महावितरणने १७०० रुपयांचे बिल पाठवून दिले. बिल भरायला उशीर केला म्हणून कनेक्शन तोडायला माणूसही पाठवून दिला.खरंच आपण भाग्यवान आहोत, आपले इंग्लडपेक्षा कार्यक्षम वीज मंडळ आहे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया थेट लंडनमधून शेतकरी संघटनेच्या ट्विटरवर आली आहे. राजू शेट्टी यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर रात्री सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा फोटो ट्विट केल्यावर ऑक्सफोर्ड परिसरात राहणाऱ्या मराठी तरुणाने ही उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिवसा विजेसह बिल दुरुस्ती व अन्यायी वसुलीच्या विरोधात मंगळवारपासून महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी मध्यरात्री कार्यकर्त्यांनीच तेथे चूल मांडून तयार केेलेला झुणका भाकर खाऊन शेट्टी यांच्यासह आंदोलनकर्ते शेतकरी महावितरणच्या दारातच झोपी गेले. दरम्यान, यातील एक कार्यकर्त्याने मध्यरात्री हा फोटो काढत समाज माध्यमावर टाकला. स्वत: शेट्टी यांनी सकाळी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो शेअर केेला. हा फोटो दिवसभर सर्वत्र व्हायरल झाला.त्यावर सुमित बरगाळे या लंडनमध्ये राहणाऱ्या तरुणाने शेट्टीचा महावितरणच्या समोर झोपलेल्या फोटोला रिट्विट व कमेंट करताना लंडन आणि कोल्हापुरातील वीज कंपनीची तुलना केली. लंडनमध्ये वादळ झाल्याने चार दिवसांपासून वीजपुरवठा ठप्प झाला. नागरिकांची गैरसोय नको म्हणून तेथील वीज कंपनीने नागरिकांना पॅकेज जाहीर केले.यात वीज नसल्याने जेवण करता येत नसेल तर रोज बाहेरून जेवण आणण्यासाठी ६० पौंड्स म्हणजेच ६ हजार रुपये मिळत आहेत. या रकमेचे ते जेवण घरी मागवू शकतात, किंवा हॉटेलमध्ये जाऊन जेऊ शकतात. वीज नसल्याने घरात राहणे शक्य नसल्यास हॉटेलमध्ये राहण्याची सोयही वीज कंपनीने करून दिली आहे. हे सर्व सांगितल्यानंतर त्याने इथल्या महावितरणचे प्रताप सांगताना बंद घर असतानाही बिल पाठवून देऊन कनेक्शन तोडण्याची केलेल्या कार्यवाहीचा उल्लेख करून कार्यक्षम वीज मंडळ अशी उपरोधिक टीकाही केली आहे.दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूचमहावितरणच्या कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन बुधवारीही सुरू राहिले. महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी मंगळवारी रात्री येऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण त्यांना नकार मिळाला. बुधवारी कोणाही अधिकाऱ्यांनी विचारपूस केली नाही अथवा चर्चेेसाठी आमंत्रणही आलेले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी