आरसी गँगवर मोक्का; प्रस्ताव तयार
By Admin | Updated: January 17, 2017 00:41 IST2017-01-17T00:41:56+5:302017-01-17T00:41:56+5:30
गंभीर गुन्हे : म्होरक्या रवी शिंदे याच्यासह १९ साथीदारांचा समावेश

आरसी गँगवर मोक्का; प्रस्ताव तयार
एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर
कर्नाटक-महाराष्ट्रात तीसपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरसी गँगचा म्होरक्या रवी शिंदे याच्यासह त्याच्या १९ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. एसटी गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदारपाठोपाठ आरसी गँगला मोक्का लावून जिल्ह्यांतील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात खून, घरफोड्या, लूटमारीसारख्या घटना वाढत आहेत. राजकीय पाठबळामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावली आहे. गँगवार, वर्चस्ववादातून खून, खुनाचे प्रयत्न अशा गंभीर घटना घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आरसी गँगने रस्त्यावर गोळीबार करण्याचे धाडस केले होते. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी आरसी गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना दिले.त्यानुसार त्यांनी गँगचा म्होरक्या रवी शिंदे याच्यासह १९ जणांची यादी तयार केली आहे. शिंदे याच्यावर संगमेश्वरसह राजारामपुरी, करवीर, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संघटित गुन्हेगारीचे तीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांच्या गुन्ह्णांची कुंडलीही काढली आहे. हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्याची तयारी केली आहे.
यापूर्वी झालेली मोक्का कारवाई
अवधूत माळवी खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार संजय भैरू वास्कर, सार्वजनिक उत्सव व निवडणुकीमध्ये उपद्व्याप करणारे गुंड शशिकांत बाबासाहेब गायकवाड, कुणाल राजाराम गायकवाड, सिद्धार्थ राजाराम माने, निवास दत्तात्रय जाधव (सर्व रा. रमणमळा, कसबा बावडा), जिल्ह्णांत मुंबई, कराड, सांगली, मिरज, कर्नाटक येथील गुन्हेगारी टोळ्यांशी लागेबांधे असणाऱ्या एसटी गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार याच्यासह साईराज दीपक जाधव, विजय ऊर्फ रॉबर्ट रवींद्र खोडवे, प्रसन्न सूर्यकांत आवटे, अनिकेत आनंदराव सातपुते, सनी प्रताप देशपांडे, विठ्ठल काशीनाथ सुतार, तुषार शिवाजी डवरी, राकेश किरण कारंडे (सर्व रा. राजारामपुरी). पेठवडगाव-वाठार परिसरात अवैध व्यवसायाबरोबरच गुंडगिरी करणाऱ्या राज ऊर्फ राजवर्धन बाबासो पाटील, पप्पू ऊर्फ प्रवीण माने, राकेश हाके या चार गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई झाली. हे सर्व गुन्हेगार कळंबा मध्यवर्ती कारागृहात खितपत पडले आहेत.
कारवाई होणाऱ्या संशयितांची नावे
रवी सुरेश शिंदे, (रा. साळोखे पार्क), विकास दीपक केसरकर, धीरज दीपक देवकर, आकाश गणेश पाटील, गणेश बाळू पाटील, प्रकाश बापू लाखे (सर्व रा. राजेंद्रनगर) योगेश मानसिंग पाटील (रा. मंगळवार पेठ), जावेद इब्राहिम सय्यद, संदीप मोतीराम गायकवाड, सागर प्रभुदास व्हटकर, रणजित मारुती कांबळे, जयसिंग सिकंदर इंद्रेकर, आकाश अशोक कदम, प्रकाश कुबेर कांबळे, सागर सखाराम मांडवकर (सर्व रा. जवाहरनगर), अमित अंकुश बामणे, सनी राम साळे (दोघे, रा. सुभाषनगर),
शीतल प्रदीप सावंत (शास्त्रीनगर), अमित दस्तगीर चौगले (टेंबलाई रेल्वे फाटक).