शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगराध्यक्षपदे खुली, ओबीसीसाठी एकही पद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:35 IST

राजकीय जोडण्या सुरू : शिरोळ, हुपरी, गडहिंग्लजला पदे आरक्षित 

कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींपैकी १० ठिकाणी खुल्या गटातून नगराध्यक्ष होणार असून शिरोळ, हुपरी आणि गडहिंग्लजची पदे आरक्षित झाली आहेत. दहापैकी पाच पदे महिलांसाठी आरक्षित आहेत. कार्यकर्त्यांसाठीच्या या निवडणुकीमुळे आता मंत्री, खासदार आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.सोमवारी दुपारपर्यंत आरक्षणाची माहिती मिळाल्यानंतर प्रत्येक पक्षांकडील इच्छुकांची प्राथमिक यादीही त्या त्या शहरात चर्चेत आली. थेट जनतेतून ही नगराध्यक्ष निवड होणार आहे. जिल्ह्यातील एकही नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित झालेले नाही.कागलमध्ये सलग तिसऱ्यांदा महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. राजकीय प्रचंड संघर्ष असलेल्या कागल शहरामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या गटात पुन्हा संघर्ष उफाळणार आहे. जयसिंगपूरचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होणार असली तरी गटातटावर ही निवडणूक होणार आहे. गेल्यावेळी ताराराणी आघाडीची मोट बांधणारेच यड्रावकर गटात सहभागी झाल्याने विरोधी नेत्यांना नव्याने आघाडी बांधावी लागणार आहे.शिरोळचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने स्थानिक नेत्यांकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. महायुती व यड्रावकर गटाकडून आमदार डॉ. माने यांच्या स्नुषा यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळणार की गटाचे राजकारण होणार यावर उमेदवारी अवलंबून आहे.पन्हाळा नगराध्यक्षपद महिलेसाठी खुले झाल्याने जनसुराज्य व स्थानिक आघाडी यात पुन्हा संघर्ष होणार आहे. या ठिकाणी आमदार डॉ. विनय कोरे हे सत्ता हस्तगत करण्यासाठी टोकाचे प्रयत्न करणार यात शंका नाही.पेठवडगावचे नगराध्यक्षपद खुले झाल्यामुळे थेट लढत होण्याची शक्यता आहे. यादव पॅनल आणि युवक क्रांती आघाडी यांच्यात जोरदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत.हातकणंगले नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने महायुती आणि महाआघाडीचे नेत्यांची उमेदवारी निवडीत कसोटी लागणार आहे. हे पद खुले झाल्याने महायुती एकसंध राहणार का? हाच खरा प्रश्न आहे.चंदगडचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बर नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सामना चुरशीचा होणार आहे. गेल्या वेळी चंदगड शहर विकास आघाडीने अनेक गटांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्षपद मिळविले होते. गेल्या वेळचा वचपा काढण्यासाठी भाजपकडूनही यावेळी आधीच व्यूहरचना करण्यात आली आहे.आजऱ्याचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने यंदाही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. नगरपंचायतीत सुरू झालेली चराटी-शिंपी गटाची समझोता एक्स्प्रेस पुढे राहणार की सवतासुभा मांडणार, याकडेही नागरिकांचे लक्ष आहे.मलकापूर नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण पडल्यामुळे अनेकांचे मनसुबे उधळले आहेत. महायुतीकडून विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना येथे रंगेल.मुरगुडमध्ये प्रचंड चुरसमुरगुडचे नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाले असले तरी विविध पक्षप्रवेशांमुळे यंदाही येथे प्रचंड चुरस होणार आहे. मुरगूडमध्ये सत्तेत येण्यासाठी कोणत्याही दोन किंवा तीन गटांना एकत्र येऊनच निवडणुकीला सामोरे जावे लागते. सध्या शहरात राजकीय वारे जोरात वाहत आहे. काही उलथापालथीही होत आहे. नगर परिषदेवर सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्या पाटील गटात उभी दुफळी पडली आहे. दोन भावात दरी निर्माण झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होत आहे.कुरुंदवाडमध्ये नेत्यांच्या जागी सुनाकुरुंदवाड पालिका नगराध्यक्ष आरक्षण महिलेसाठी खुले झाल्याने शहरातील गटनेते ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख तीनही नेत्यांच्या घरातील महिलांची नावे चर्चेत आली आहेत. शहरात सध्या जयराम पाटील (काँग्रेस), रामचंद्र डांगे (भाजपा) व रावसाहेब पाटील (राष्ट्रवादी) असे प्रमुख तीन गट आहेत.

हुपरी नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीवहुपरीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे. लढत दुरंगी की तिरंगी याबाबत चर्चेचा खल सुरू आहे. गतवर्षी निसटता पराभव झालेल्या माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शतप्रतिशत भाजपचा नारा देत या भागातील वर्चस्वाच्या लढाईसाठी पायाभरणी केली आहे, तर विरोधकाही जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

गडहिंग्लजला राष्ट्रवादीकडे गर्दीगडहिंग्लजचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून, खरा सामना राष्ट्रवादी विरुद्ध जनता दल असाच रंगणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी असून, जनता दलाला सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था व आरक्षण

  • कागल : महिला
  • जयसिंगपूर : सर्वसाधारण
  • कुरुंदवाड : महिला
  • पन्हाळा : महिला
  • पेठवडगाव : सर्वसाधारण
  • हातकणंगले : सर्वसाधारण
  • चंदगड : सर्वसाधारण
  • आजरा : सर्वसाधारण
  • मलकापूर : महिला
  • मुरगुड : महिला
  • हुपरी : अनुसूचित जाती
  • गडहिंग्लज : अनुसूचित जाती
  • शिरोळ : अनुसूचित जाती महिला
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections: Ten Open Seats, No OBC Reservation

Web Summary : Kolhapur's municipal elections see ten open mayoral seats, five for women. Key contests include Kagal, Panhala, and Hatkanangale. Shirala reserved for SC woman. No OBC reservation. Political stakes are high.