महापौर म्हणजे निर्लज्जम सदासुखी..!
By Admin | Updated: March 8, 2015 00:26 IST2015-03-08T00:25:44+5:302015-03-08T00:26:33+5:30
मुश्रीफ यांनी फटकारले

महापौर म्हणजे निर्लज्जम सदासुखी..!
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांना वारंवार सांगूनही त्या राजीनामा देत नसल्याने त्यांची संभावना महापालिकेतील सत्तारुढ गटाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना ‘निर्लज्जम सदासुखी...’ अशी केली. त्यांना आम्ही महापौरपदाची संधी दिली परंतू आमचे नाणेच खोटे निघाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.
मुश्रीफ म्हणाले,‘ महापौरांच्या गाडीवर झालेला हल्ला तसेच त्यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून झालेली दगडफेक या घटनांद्वारे सहानुभूती मिळवण्याचा महापौर माळवी यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांना ही संधी मिळू देवू नये.
माळवी यांना महापौरपदावरून पायउतार करण्यासाठी नगरसेवकांनी कायदेशीर मार्गाचाच अवलंब करावा.’ महापौरां्च्या राजीनाम्यावरून माझ्यात व खासदार धनंजय महाडिक यांच्यात मतभेद निर्माण झाले असल्याची अफवा पसरविली जात आहे. त्यांचे व माझे संबंध आजही चांगलेच आहेत. आमचा फोनवरून कांही वादही झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी यावेळी दिले आहे. (प्रतिनिधी)