शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौर निवड : पालकमंत्र्यांना धक्का; कोल्हापुरात चमत्कार घडलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:46 IST

कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला.

ठळक मुद्देमहापौर, उपमहापौर निवड : पालकमंत्र्यांना धक्का; कोल्हापुरात चमत्कार घडलाच नाहीकाँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम

कोल्हापूर : महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला.

महापौर, उपमहापौरपद हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे कायम राखत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्का दिला. त्यामुळे पालकमंत्र्यासह भाजप-ताराराणी आघाडीला अपेक्षित असणारा चमत्कार घडलाच नाही.कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक गेल्या साडेतीन वर्षांत कधी नव्हे इतकी प्रतिष्ठेची करण्यात आली असून त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी ती वैयक्तिक पातळीवर घेतली.गेल्या दोन दिवसांपासून या दोघांनी एकमेकांवर आरोप करून निवडणुकीतील चुरस स्पष्ट केली. अल्पमतात असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीने सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का देत त्यांच्या नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा डाव रचल्यामुळे या निवडणुकीने वेगळे वळण घेतले.

नगरसेवकांची पळवापळवी, त्यांची सौदेबाजी होणार हे अपरिहार्य होते. मात्र, शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करायला विलंब केल्याने रविवारी रात्रीपर्यंत तरी भाजपच्या हाती फारसे काही लागल्याचे चित्र नव्हते.

सोमवारी सकाळी सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ४१, तर भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके बलाबल राहिले. शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व कायम राहिले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील