मावा, गुटखा विक्रीप्रकरणी दोन पानपट्टीवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:30 IST2021-09-07T04:30:58+5:302021-09-07T04:30:58+5:30
कोल्हापूर : राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असताना शिवाजी उद्यमनगरातील महालक्ष्मी पान शॉप व प्रगती पान शॉप ...

मावा, गुटखा विक्रीप्रकरणी दोन पानपट्टीवर छापे
कोल्हापूर : राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असताना शिवाजी उद्यमनगरातील महालक्ष्मी पान शॉप व प्रगती पान शॉप या दोन पानपट्टीवर छापे टाकून तेथून सुमारे सहा हजार रुपये किमतीचा मावा जप्त केला. याप्रकरणी दोघा पानपट्टीचालकावर गुन्हे नोंदवले.
महालक्ष्मी पान शॉपमध्ये टाकलेल्या छाप्यात सुगंधी सुपारी, सुगंधीत तंबाखू, चुना, पान मसाला आदी पदार्थ मित्रीत मावा व गुटखा असा सुमारे ४१४० रुपयेचा माल जप्त केला. तर प्रगती पान शॉपवरील छाप्यात पान मसाला, सुगंधीत तंबाखू असा सुमारे १८७० रुपयेचा माल जप्त केला. कारवाईत अनुक्रमे ओमकार मानसिंग पाटील (वय २७ रा. कळंबा) व गौरव बिरु येडगे (वय २८ रा. म्हाडा कॉलनी, सुभाषनगर) यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला, ही कारवाई अन्न औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.