सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील मौनीनगर साखर कारखाना सेवक पतसंस्थेला अहवाल सालात ४० लाख १३ हजारांवर नफा झाल्याची माहिती ५७ व्या वार्षिक सभेत देण्यात आली. कोरोनामुळे या संस्थेची सभा ऑनलाइन पार पडली.
यावेळी सुनील पिराले, प्रवीण माने, कृष्णात साठे आदी सभासदांनी चर्चेत भाग घेतला. अहवाल वाचनात मॅनेजर राजेंद्र मोरे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष व मॅनेजर यांनी उत्तरे दिली. सभेस अध्यक्ष तानाजी दत्तात्रय फराकटे व उपाध्यक्ष शिवाजी तुकाराम आबिटकर, संचालक जगदीश पाटील, मनोज केरकर, वसंतराव कोंडेकर, डी. एम. जरग, आनंदा कांबळे, संदीप तिबिले, आनंदा पाटील, विठ्ठल साबळे, सुनील मिसाळ, अप्पासाहेब पाटील, वंदना बेलेकर, पद्मा भिऊंगडे आदी उपस्थित होते. सभासद ऑनलाइन सहभागी झाले होते. माजी अध्यक्ष संदीप तिबिले यांनी स्वागत केले. तानाजी फराकटे यांनी आभार मानले.
........ फोटो
बिद्री येथे मौनीनगर साखर कामगार सेवकांच्या पतसंस्थेच्या ऑनलाइन वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष तानाजी फराकटे व इतर.