‘मातोश्री’त ‘थर्टी फर्स्ट’ जोषात

By Admin | Updated: January 1, 2015 00:29 IST2015-01-01T00:28:14+5:302015-01-01T00:29:08+5:30

मातोश्री वृद्धाश्रमात नित्याप्रमाणे प्रत्येकांची दिनचर्या सुरू असली, तरी आज त्याला झालर होती थर्टी फर्स्टची.

'Matthri' in 'Thirty First' Joshat | ‘मातोश्री’त ‘थर्टी फर्स्ट’ जोषात

‘मातोश्री’त ‘थर्टी फर्स्ट’ जोषात


कोल्हापूर : आयुष्याच्या सांजवेळी थकलेले शरीर साथ देत नसले, तरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व येणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्याचा मोह वृद्ध आजी-आजोबांना आवरता आला नाही. औचित्य होते आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमात हाय कॅलरीज ग्रुपतर्फे आयोजित ‘थर्टी फर्स्ट’ कार्यक्रमाचे.
वृद्धसेवा हीच ईश्वरसेवा मानून शिवाजीराव पाटोळे यांच्या मातोश्री वृद्धाश्रमात त्यांचे कुटुंबीय सेवा करण्यात मग्न झाले. वृद्धांच्या मायेने सांभाळ करण्यात त्यांना आनंद वाटतो. अशा अनेक आजी-आजोबांना हक्काचे घर मिळवून देण्याचे काम मातोश्री वृद्धाश्रमाने केले आहे. सध्या १३० वृद्ध आजी-आजोबा या हक्काच्या घरात वास्तव्य करतात.
मातोश्री वृद्धाश्रमात नित्याप्रमाणे प्रत्येकांची दिनचर्या सुरू असली, तरी आज त्याला झालर होती थर्टी फर्स्टची. यामुळे मातोश्री वृद्धाश्रम परिसरात झाडलोट, स्वच्छता, रांगोळीचा सडा यातून येथील आजी-आजोबांची गतवर्षास गुडबाय करण्याची तयारी दिसून येत होती.तळवळकर गु्रप, हाय कॅलरीज ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन अन्यत्र थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यापेक्षा वृद्धाश्रमात दुपारी भोजनाची व्यवस्था केली आणि थर्टी फर्स्टचा आनंद या वृद्ध आजी-आजोबांसमवेत एन्जॉय केला अन् सरत्या वर्षाला निरोप देताना या आजी-आजोबांच्या आयुष्यातील वेदनांचा नक्कीच विसर पडला असेल, कारण वृद्धाश्रम हे त्यांच्या हक्काचे घर बनले आहे. वृद्धाश्रमात उत्सव, कार्यक्रम मोठ्या आनंदात होत असतात.


नववर्षाचे होणार स्वागत
मातोश्री वृद्धाश्रमात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी १ जानेवारीला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात गतवर्षात वृद्धाश्रमात निधन झालेल्या १५ वृद्धांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच नवीन दाखल झालेल्या दहा सदस्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच वर्षभर झालेले विविध कार्यक्रम, धार्मिक उत्सव यांचा आढावा घेण्यात येणार आहे. देणगीदार यांचे आभार मानून मिठाई वाटप, असा संयुक्तकार्यक्रम होणार आहे.

Web Title: 'Matthri' in 'Thirty First' Joshat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.