शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काळात जप्त केलेला मुद्देमाल २४ तासांत परत, तक्रार निवारण समितीमुळे व्यावसायिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 16:49 IST

कोल्हापूर : निवडणूक काळात सोने, चांदी, रोख पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे ते हमखास जप्त होणार हे ...

कोल्हापूर : निवडणूक काळात सोने, चांदी, रोख पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे ते हमखास जप्त होणार हे आतापर्यंत ठरलेले असायचे. हा जप्त मुद्देमाल प्रशासनाच्या ताब्यातून सोडवण्यासाठी संबंधिताच्या अक्षरश: चपला झिजतात. मात्र, हाच मुद्देमाल आता २४ तासाच्या आत संबंधितांना मिळू लागला आहे. जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीमुळे यात पारदर्शकता आली असून या काळात मौल्यवान वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.निवडणूक काळात मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशाचे आमिष दाखवले जाते. त्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहिता लागू झाल्यावर जागोजागी तपासणी नाके उभे करून वाहनांची तपासणी करते. यात सोने, चांदी, रोख पैसे व मौल्यवान धातू आढळल्यास थेट ते जप्त केले जातात. हे पैसे किंवा दागिने निवडणुकीसाठी नाही तर व्यावसायिक वापरासाठी नेले जात असल्याचा पुरावा दिल्याशिवाय परत मिळत नाहीत. यासाठी संबंधित व्यावसायिकाला ते परत मिळवण्यासाठी हजारदा हेलपाटे मारावे लागत.निवडणूक आयोगाने अशा प्रकारे पकडलेले दागिने, पैसे व्यापाऱ्याचे आहेत की राजकीय वापरासाठी वापरले जाणार आहेत. याची शहानिशा करण्यासाठी जिल्हानिहाय तक्रार निवारण समिती नेमली आहे. या समितीसमोर जप्त केलेला माल निवडणुकीसाठी वापरणार नसल्याचे सिद्ध केल्यास २४ तासाच्या आत तो परत मिळतो.

हुपरीतील व्यावसायिकांचा पुढाकारहुपरीतील चांदी व्यवसाय देशभर प्रसिद्ध आहे. येथील चांदीचे विविध प्रकारचे दागिने देशातील अनेक शहरांमध्ये पाठवले जातात. मात्र, निवडणूक काळात हे दागिने चेकपोस्टवर वारंवार पकडले जात असल्याने या काळात येथील व्यावसाायिकांना मोठा फटका बसत होता. याविरोधात आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तक्रार निवारण समिती सक्र य केली.

निवडणूक काळात जर मौल्यवान वस्तू किंवा रोख पैसे जप्त केले तर तक्रार निवारण समितीकडे जाऊन या वस्तूंचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही याचे पुरावे द्यावे लागतात. त्याची पडताळणी करून यात तथ्य आढळले तर आपला माल आपणास २४ तासांत परत मिळतो. -मोहन खोत, अध्यक्ष, हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024