शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

मटका भोवला; कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष पाटील हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : येथील नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष जवाहर ऊर्फ बाबासाहेब जिनगोंडा पाटील यांना इचलकरंजी विभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. पालिका पदाधिकाºयावरील हद्दपारीची कारवाई ही कुरुंदवाडच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या कारवाईने राजकीय खळबळ उडाली. दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांनी उपनगराध्यक्ष पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : येथील नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष जवाहर ऊर्फ बाबासाहेब जिनगोंडा पाटील यांना इचलकरंजी विभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. पालिका पदाधिकाºयावरील हद्दपारीची कारवाई ही कुरुंदवाडच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या कारवाईने राजकीय खळबळ उडाली. दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांनी उपनगराध्यक्ष पाटील यांना कर्नाटक राज्यातील कागवाड (ता. अथणी) येथे सोडले.कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी २०१६ मध्ये मटका बुकी मालक जवाहर पाटील यांच्याबाबत मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलमानुसार ५६ (अ) (ब) नुसार हद्दपार करण्याचा प्रस्ताव इचलकरंजी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.या प्रस्तावाचा जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक यांनी तपास करून प्रांताधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला होता. या प्रस्तावानुसार सदर व्यक्ती राहते ठिकाणी अपराध करू शकत असल्याने त्यास हद्दपाल करण्यात यावे, असा मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कमल ५६ ची तरतूद आहे. त्यामुळे या कलमानुसार जवाहर पाटील यांना दोन वर्षांसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचा आदेश प्रांताधिकारी शिंगटे यांनी आज दिला.राजकीय उलथापालथी शक्यजवाहर पाटील हे मटका बुकी चालवित असल्याने त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. यापूर्वीही त्यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव सादर झाला होता, मात्र त्यातून अभय मिळविण्यात ते यशस्वी झाले होते. पाटील राष्ट्रवादीचे असून, नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदावर आहेत. त्यांचा राजकीय कार्यकालही वादग्रस्त आहे. नगरपालिकेच्या एखाद्या पदाधिकाºयावर हद्दपारीची नामुष्की येणे ही कुरुंदवाडच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. यामुळे पालिकेतील राजकीय उलथापालथींना गती मिळण्याची शक्यता आहे.