शिवसेना संपविण्याची भाषा करणारे मातीमोल - राजेश क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:29+5:302021-06-20T04:17:29+5:30
कोल्हापूर : शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून हे ...

शिवसेना संपविण्याची भाषा करणारे मातीमोल - राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे. त्यामुळे शिवसेना संपविण्याची भाषा करणारे मातीमोल झाल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी शिवसेना शहर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. एक हजार कुटुंबीयांना दहा लाख किमतीच्या जीवनावश्यक साहित्यांच्या किटचे वाटपही करण्यात आले. या वेळी रक्तदान शिबिरात ५०१ रक्त पिशव्यांचे संकलन झाले.
राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाची शिकवण आजही पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यातून अखंडित सुरू ठेवली आहे. त्यानुसार आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची वाटचाल सुरू आहे.
शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, ऋतुराज क्षीरसागर, राजू हुंबे, शशिकांत पाटील, इंदजित आडगुळे, अरुण सावंत, जयवंत हारुगले, रमेश खाडे, रणजित जाधव, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, सुनील खोत, अजित गायकवाड, अमित चव्हाण, अश्विन शेळके, किशोर घाटगे, ज्योती हंकारे, अभिषेक देवणे, रियाज बागवान, राजू काझी आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी शिवसेना शहरच्यावतीने एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ऋतुराज क्षीरसागर, रविकिरण इंगवले आदी उपस्थित होते. (फोटो-१९०६२०२१-कोल- राजेश क्षीरसागर)