शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

असा हा कारभार, दिव्यांग साहित्याचे झाले ‘भंगार’; कोल्हापूर जिल्ह्यात चार हजार लाभार्थ्यांचे साहित्य पडून

By समीर देशपांडे | Updated: May 29, 2025 19:10 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियाना’तून दिव्यांगांसाठी मिळालेल्या साहित्याचे ‘भंगार’ वास्तव समोर आले आहे. चार हजार ...

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियाना’तून दिव्यांगांसाठी मिळालेल्या साहित्याचे ‘भंगार’ वास्तव समोर आले आहे. चार हजार दिव्यांगांनी हे साहित्य नेले नसल्याने आणि याबाबत पुढे काय करायचे याबाबत अधिकारीही बेफिकीर राहिल्याने बाराही पंचायत समित्यांच्या इमारतींमध्ये हे साहित्य सडत पडले आहे. एकीकडे दिव्यांगांच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना लाभार्थ्यांनी साहित्यच न नेणे आणि या साहित्याची पुढे विल्हेवाट न लावली जाणे हे शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीचे अपयश मानावे लागेल.जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी या अभियानाचे नियोजन केले आणि ग्रामीण भागात हे अभियान २०१८ साली राबविण्यात आले होते. दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांना नेमक्या काय साहित्याची गरज आहे याची नोंद घेण्यात आली. यातून २२ हजार ४०२ दिव्यांगांची नोंद झाली, तर त्यातील १५ हजार ७३६ दिव्यांगांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या ॲल्मिको कंपनीच्या माध्यमातून साहित्य पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतरही सात महिने साहित्य पडून होते. अखेर केंद्रीय मंत्र्यांची तारीख मिळाल्यानंतर या साहित्य वितरणाचा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात झाला; परंतु ऑक्टोबर २०२१ पर्यंत चार हजार दिव्यांगांनी हे साहित्यच नेले नव्हते. १५ नोव्हेंबरपर्यंत हे साहित्य संबंधित लाभार्थ्यांनी न नेल्यास ते परत पाठवण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी घेतला होता; परंतुही यात पुढे काहीच न झाल्याने पंचायत समित्यांच्या इमारतींमध्ये हे साहित्य गंजत पडले आहे.

हे साहित्य गंजून जाण्यापेक्षा दिव्यांगांच्या संस्था आणि शाळा यांना देण्यात यावे. जेणेकरून याचा वापरही होईल. काही दिव्यांगांचे मोबाइल नंबर चुकीचे असणे, पत्त्यावर संबंधित व्यक्ती नसणे यामुळेही काही साहित्य पडून आहे. याची शहानिशा करण्याची गरज आहे. - देवदत्त माने, अध्यक्ष, प्रहार संघटना 

बाराही पंचायत समित्यांमध्ये पडून असलेल्या साधनांची तपासणी करून चांगले साहित्य दिव्यांगांना वितरित करण्यात येईल, तर जे साहित्य खराब झाले आहे. ते निर्लेखित करण्यात येईल.  - कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद