‘गडहिंग्लजला सामना ‘तिरंगी’च
By Admin | Updated: November 11, 2016 23:49 IST2016-11-11T23:49:48+5:302016-11-11T23:49:48+5:30
नगराध्यक्षपदासाठी थेट लढत : १७ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात

‘गडहिंग्लजला सामना ‘तिरंगी’च
गडहिंग्लज : अपेक्षेप्रमाणे गडहिंग्लज नगरपालिकेसाठी तिरंगी लढतीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले. याठिकाणी सत्ताधारी जनता दल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजप-सेना युती असा तिरंगी सामना होत आहे. नगराध्यक्षपदासाठीही तिरंगी थेट लढत होत असून नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात उतरले आहे.
नगराध्यक्षपदासाठी प्रा. स्वाती कोरी (जनता दल), रमेश रिंगणे (राष्ट्रवादी), वसंत यमगेकर (भाजपा) यांच्यात तिरंगी थेट लढत होत आहे. नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६ जणांनी माघार घेतली. नगरसेवक पदासाठी १०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३५ जणांनी माघार घेतली.
प्रभागनिहाय उमेदवार व कंसात पक्ष - प्रभाग १ अ - विनोद बिलावर (जनता दल), रामदास कुराडे (राष्ट्रवादी), दीपक कुराडे (भाजपा), वीरसिंग बिलावर (काँगे्रस) १ ब - सुलोचना मोरे (जद), अरूणा कोलते (राष्ट्रवादी), शशीकला पाटील (भाजपा), नाजनीन अत्तार (अपक्ष), शारदा आजरी (अपक्ष)
प्रभाग २ अ - कल्पना कांबळे (जद), रेश्मा कांबळे (राष्ट्रवादी), प्रेमा विटेकरी (भाजप), शालन कासारीकर (शिवसेना), पुनम म्हेत्री (अपक्ष) २ ब - उदय पाटील (जद), बाळासाहेब घुगरे (राष्ट्रवादी), शिवानंद पाटील (भाजपा), सागर कुराडे (शिवसेना), रमजान अत्तार (अपक्ष), सचिन प्रसादे (अपक्ष), स्वप्निल चराटी (अपक्ष)
प्रभाग ३ अ - गंगाधर हिरेमठ (जद), हारूण सय्यद (राष्ट्रवादी), संदीप नाथबुवा (भाजपा), प्रकाश रावळ (शिवसेना), चंद्रकांत कुंभार (अपक्ष), ३ ब - सरिता भैसकर (जद), सावित्री पाटील (राष्ट्रवादी), निलांबरी भुर्इंबर (भाजपा), मंगल जाधव (शिवसेना), मधुमंजिरी जाधव (अपक्ष)
प्रभाग ४ अ - तरनुम खलीफ (जद), रूपाली परीट (राष्ट्रवादी), शगुप्ता खलीफ (भाजप), करिश्मा मुल्ला (काँगे्रस) ४ ब - नरेंद्र भद्रापूर (जद), सुनिल गुरव (राष्ट्रवादी), राजेंद्र हत्ती (भाजप), सतीश हळदकर (अपक्ष), चंद्रशेखर रुडगी (अपक्ष), किरण डोमणे (अपक्ष),
प्रभाग ५ अ - क्रांतीदेवी शिवणे (जद), श्वेता कदम (राष्ट्रवादी), सुरेखा मोहिते (शिवसेना), प्रभाग ५ ब - बसवराज खणगावे (जद), अमर मांगले (राष्ट्रवादी), संदीप कुरळे (भाजप), उत्तम देसाई (काँगे्रस)
प्रभाग ६ अ - नाज खलीफा (जद), माधुरी शिंदे (राष्ट्रवादी), गीता सुतार (शिवसेना) ६ ब - प्रकाश मोरे (जद), सूर्यकांत नाईक (राष्ट्रवादी), संतोष चौगुले (काँगे्रस), श्रद्धा शिंत्रे (शिवसेना), विजय शिवबुगडे (अपक्ष), राजेश सावंत (अपक्ष),
प्रभाग ७ अ - वीणा कापसे (जद), अरूणा शिंदे (राष्ट्रवादी), अनिता पेडणेकर (भाजप), ७ ब - नितीन देसाई (जद), किरण खोराटे (राष्ट्रवादी), अरविंद पाटील (भाजप), राजेंद्र चव्हाण (स्वाभिमानी)
प्रभाग ८ अ - राजेश बोरगावे (जद), दुंडाप्पा नेवडे (राष्ट्रवादी), सदाशिव कोरवी (भाजप), संतोष पाथरवट (अपक्ष), निशीकांत कोकिळे (काँगे्रस) ८ ब - सुनिता पाटील (जद), संपदा पोवार (राष्ट्रवादी पुरस्कृत), स्वाती चौगुले (मनसे), ८ क - शकुंतला हातरोटे (जद), शुभदा पाटील (राष्ट्रवादी),
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी संगीता राजापूरकर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी तानाजी नरळे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)
प्रभागनिहाय उमेदवारांची संख्या
प्रभाग १ अ (४), ब (४), २ अ (५), ब (७), ३ अ (५), ब (५), ४ अ (४), ब (६), ५ अ (३), ब (४), ६ अ (३), ब (६), ७ अ (३), ब (४), ८ अ (५), ब (३), क (३)