शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सरकारला आलंय टेन्शन.. द्यावी लागंल जुनी पेन्शन; कोल्हापुरात सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा विराट मोर्चा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 4, 2023 14:26 IST

उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता ५० हजारावर सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले

कोल्हापूर : सरकारला आलंय टेन्शन द्यावी लागंल जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, जुनी पेन्शन न देणाऱ्या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची.. अशा घोषणांनी अख्खे कोल्हापूर दणाणून सोडत शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चा काढत शनिवारी सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला. विकेंडच्या सुट्टीला भर दुपारी उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता ५० हजारावर सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले. ही सुरूवात आहे..आता राज्यभर मोर्चे काढू असा निर्धार यावेळी करण्यात आला.जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गेली अनेक वर्षे शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांचा लढा सुरू आहे. त्यासाठी १४ मार्चपासून राज्यभर बेमुदत संप पुकारला असून त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राज्य सरकारी निमसरकारी,, शिक्षक, शिक्षकेतर, महापालिका कर्मचारी समन्वय समिती व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.गांधी मैदानातून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. एकच मिशन जुनी पेन्शन लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या व पांढरी वेशभूषा करून कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शनिवार सुट्टीचा दिवस व भर दुपारच्या उन्हामुळे रस्त्यांवर तुलनेने गर्दी कमी होती पण मोर्चामुळे अख्खे शहर पॅक झाले. मिरजकर तिकटी, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. या मार्गाला लागून असलेल्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे मान्यवरांची भाषणे झाली.फलकांनी वेधले लक्ष..जो देईल जुनी पेन्शनला साद, त्यालाच असेल आमची साथ, कोई तो निकालो इसका हल, बिना पेन्शन कैसे बितेगा कल, जुन्या पेन्शनचा वाद नका वाढवू, नाहीतर आम्ही सत्तेतून घालवू, ज्यांना आम्ही गादीवर बसवलं त्यांनीच आम्हाला रस्त्यावर आणलं, नका करू जुन्या पेन्शनची बेरीज नाही तर आणू सत्ताधाऱ्यांना जेरीस.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPensionनिवृत्ती वेतनTeacherशिक्षकMorchaमोर्चा