विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:52 IST2020-12-11T04:52:09+5:302020-12-11T04:52:09+5:30

कोडोली : साखरवाडी (ता. पन्हाळा) येथे २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी कोडोली पोलिसांनी दोघांना ताब्यात ...

Mass atrocities on married women | विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार

विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार

कोडोली : साखरवाडी (ता. पन्हाळा) येथे २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी कोडोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी (दि. ९) दुपारी २.३०च्या सुमारास घडली होती. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने स्वत: कोडोली पोलिसांत गुरुवारी रात्री दिली आहे. प्रकरणी संदेश ऊर्फ पुष्पक आदाम ढगे (वय १९) व एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पीडित महिलेचे दीड वर्षाचे लहान बाळ रडत असल्याने त्याला शांत करण्यासाठी ती शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या घरी गेली होती. यावेळी पुष्पक ढगे हा तेथे होता. यावेळी त्यांनी पीडित महिला घरात आल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडित महिलेचा पती परगावी गेला होता. तो गुरुवारी घरी आल्यानंतर त्याला ही घटना समजल्यावर त्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील हे करीत आहेत.

Web Title: Mass atrocities on married women