परप्रांतीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST2021-01-13T05:02:51+5:302021-01-13T05:02:51+5:30

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे : काजल शंकर योगी (वय ३५), रामकरण बंसीधर योगी (३५ दोघेही रा. बिरणाटनगर, राज्यस्थान), दिलीप ...

Mass atrocities on a foreign pregnant woman | परप्रांतीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार

परप्रांतीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे : काजल शंकर योगी (वय ३५), रामकरण बंसीधर योगी (३५ दोघेही रा. बिरणाटनगर, राज्यस्थान), दिलीप रामेश्वर योगी (३०) सीमा दिलीप योगी (२२ दोघेही मूळ गाव- झाडलीपुराणी, सिक्कर, राजस्थान. सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर).

आसाममधील १९ वर्षीय पीडितेचा चार वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. सध्या पीडित सहा महिन्यांची गर्भवती आहे. सप्टेंबर २०२० मध्ये तिचा पती कामावर गेल्यानंतर तिच्या लाैखी नावाच्या मावशीने घरी बोलावले. तेथे काजल नावाची महिला, दिलीप योगी व रामकरण योगी असे होते. तेथे पीडितेला गुंगीचे औषध पाजून अपहरण केले. होजाई (आसाम) येथे मुलीला ठार मारण्याची धमकी देत पीडितेचा जबरदस्तीने रामकरणशी विवाह लावला. त्याने मेढगाव (राजस्थान) येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. दोन महिन्यांपूर्वी रामकरण, सीमा, दिलीप हे पीडितेसह रेल्वेने कोल्हापूरला आले. महिनाभर पीडितेला रामकरण याने रायगड काॅलनीतील भाड्याच्या घरात डांबून ठेवले. तेथे रामकरण आणि दिलीप याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तिच्यावर सप्टेंबर २०२० ते ८ जानेवारी २०२१ दरम्यानच्या कालावधीत अत्याचार केले. दरम्यान, शेजाऱ्यांच्या मदतीने पीडितेने करवीर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दिली.

तुला आम्ही खरेदी केलंय...

रायगड कॉलनीत पीडितेने अत्याचारास विरोध केल्यानंतर ‘तुला आम्ही खरेदी केलयं, आम्ही सांगेल ते तुला करावेच लागेल’ असे सांगून तिला मारहाण करून अनोळखी तीन पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास रामकरण योगी याने भाग पाडले.

Web Title: Mass atrocities on a foreign pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.