शिक्षकाकडून मास्क, सॅनिटायझर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:31+5:302021-05-05T04:39:31+5:30
कोल्हापूर : शिरोली (पुलाची) येथील कुमार विद्यामंदिर क्रमांक २ चे सहायक शिक्षक द्वारकनाथ भोसले यांच्याकडून महापालिकेस मास्क व सॅनिटायझर ...

शिक्षकाकडून मास्क, सॅनिटायझर भेट
कोल्हापूर : शिरोली (पुलाची) येथील कुमार विद्यामंदिर क्रमांक २ चे सहायक शिक्षक द्वारकनाथ भोसले यांच्याकडून महापालिकेस मास्क व सॅनिटायझर भेट म्हणून दिले. महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्यांचा स्वीकार केला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. प्रशासनाबरोबरच शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या महामारीच्या युद्धात सहभागी झाले आहेत. महानगरपालिकेच्या चारीही विभागीय कार्यालयांत व ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, वॉर रूम, अलगीकरण, विलगीकरण केंद्रे या ठिकाणी कोरोनाबाधित नागरिकांना अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्याच्या कामकाजामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही मदत करीत आहेत.
यावेळी उपआयुक्त रविकांत आडसूळ, आरोग्यधिकारी डॉ. अशोक पोळ, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव, लेखापाल राजीव साळाखे, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई, बाळासाहेब कांबळे, अजय गोसावी, सचिन पांडव, शांताराम सुतार उपस्थित होते.