चाटे स्पोर्टस् अकॅडमीकडून मॅस्काॅट पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:27 IST2021-03-01T04:27:21+5:302021-03-01T04:27:21+5:30
रविवारी सकाळी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मॅस्काॅट संघाने ४२ षटकांत सर्वबाद १८१ धावा केल्या. जुनेद मलबारीने ...

चाटे स्पोर्टस् अकॅडमीकडून मॅस्काॅट पराभूत
रविवारी सकाळी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मॅस्काॅट संघाने ४२ षटकांत सर्वबाद १८१ धावा केल्या. जुनेद मलबारीने ७८, आलोक कानिटकरने ५०, अथर्व पोवारने ३० धावा केल्या. चाटे स्पोर्टस्कडून यतिराज पाटोळे, अर्णव पाटील यांनी प्रत्येकी तीन, तर दर्शन निंबाळकर व आर्यन वर्मा यांनी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना चाटे स्पोर्टस्ने ४८ षटकांत सर्वबाद २४२ धावा केल्या. यतिराज पाटोळेने ७८, आर्यन वर्मा याने ४० व अथर्व शेळके याने २७ धावा केल्या. ‘मॅस्काॅट’कडून जुनेद मलबारी याने तीन, तर अलोक कानिटकर याने दोन बळी घेतले. ‘मॅस्काॅट’चा दुसरा डाव ३५ षटांकात ७२ धावांत संपला. यातही पाटोळेने चाटेकडून चार बळी घेतले. दुसऱ्या डावात चाटे संघाने ७ षटकांत ३६ धावा करून नऊ गडी राखून हा सामना जिंकला.
फोटो : २८०२२०२१-कोल-यतिराज पाटोळे