मसाई पठाराचे रूप पालटणार

By Admin | Updated: November 27, 2015 00:13 IST2015-11-26T21:29:49+5:302015-11-27T00:13:23+5:30

विकासकामे होणार : पर्यटन प्रकल्प आराखडा स्वीकारला

The Masai Plateau will change | मसाई पठाराचे रूप पालटणार

मसाई पठाराचे रूप पालटणार

पन्हाळा : मसाई पठार विकास आणि पर्यटन प्रकल्पाचा आराखडा राज्य शासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समितीमधील पर्यटन विकास समितीने स्वीकारल्याचे मसाई पठार कृषी व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी सांगितले.
पन्हाळ्याच्या पूर्वेला व पन्हाळ्यापासून दोन कि.मी. अंतरावर असलेले मसाई पठार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे ‘टेबल लँड’ आहे. वन विभागाने या मसाई पठारावर ‘रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून घोषित करण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही, यावर मसाई पठार कृषी व पर्यावरण मंडळाने गेल्या २० वर्षांपासून पर्यटन विकास प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता. राज्य शासनाने त्यास हिरवा कंदील दाखवून या मंडळाचा आराखडा स्वीकारल्याचे पत्र दिले आहे.
पन्हाळा ते मसाई पठार रोप-वे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन विकास समिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आहे. जरी मसाईदेवी कृषी व पर्यावरण मंडळाचा हा पर्यटन विकास आराखडा स्वीकारला असला तरी या पठारावर कोणतेही बांधकाम न करता वनविभाग प्रकल्प राबविणार आहे.
मसाई पठार पर्यटन विकास प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षांत तळ्यांचे गाळ काढण्यासाठी दीड कोटी रुपये वनविभागाला मिळाले आहेत. मात्र, काढलेला गाळ तिथेच पसरल्याने कास पठारावर जशी फुले येतात. तशी फुले येणे मसाई पठारावर बंद झाल्याने या प्रकल्पाचे गांभीर्य किंवा जैवविविधतेचे गांभीर्य वनविभागाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेसाठी मसाई पठार कृषी व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, उपाध्यक्ष संजीवनचे अध्यक्ष पी. आर. भोसले, सचिव पन्हाळा पोलीस पाटील भीमराव काशीद, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)


४यात प्रामुख्याने पठारावर असणारी लहान-मोठी तळी यांचा गाळ काढून सुशोभीकरण करणे, विविध झाडे लावून त्या ठिकाणी औषधी वनस्पती, नक्षत्र गार्डन तयार करणे, वन्यप्राणी, पक्षांना पोषक वातावरण निर्माण करणे, बोटिंग, कारंजे, बांबू हाऊस, पॅराग्लायडिंग केंद्र, साहसी खेळ, आदी बाबींचा विकास करणे.


छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यातून विशाळगडाकडे जाताना या पठारावरून गेले त्या मार्गावर दुतर्फा झाडे लावणे, विद्युत- निर्मितीसाठी विंडमिल व सोलर पॅनेलचा उपयोग करणे, आदी बाबींबर या पर्यटन विकास प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे.

सुमारे
१७ कोटी खर्चाचा हा पर्यटन विकास प्रकल्प पर्यटकांंना आकर्षित करणाऱ्या विविध गोष्टी आहेत.

Web Title: The Masai Plateau will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.