दीपावलीसाठी बाजारपेठा सज्ज

By Admin | Updated: October 9, 2014 00:47 IST2014-10-09T00:39:46+5:302014-10-09T00:47:45+5:30

यंदा बोनसही वेळेत : बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण

Markets ready for Diwali | दीपावलीसाठी बाजारपेठा सज्ज

दीपावलीसाठी बाजारपेठा सज्ज

कोल्हापूर : अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावली सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. सर्व उद्योगांनी दिलेला बोनस, यंदाच्या दिवाळीत मागील वर्षीपेक्षा बाजारातील उलाढाल अधिक होण्याचा अंदाज बांधून तयार फराळ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, धान्य व्यापारी, कपडे व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात माल मागविला आहे.
यंदाची दीपावली बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण घेऊन आली आहे. जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला पडल्याने शेती उत्पादन चांगले झाले आहे. यामुळे बळिराजाही सुखावला आहे. असे असले तरी मात्र, उसाचा हप्ता निवडणुकांमुळे जाहीर झालेला नाही. त्यामुळे काही प्रमाणात बळिराजा पावसाकडून सुखावला असला तरी कारखान्यांच्या ऊसदराच्या घोषणा न झाल्याने नाराजी आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठांवर होत आहे.
शहरातील महत्वाच्४या असलेल्या राजारामपुरी, महाद्वार रोड, शाहुपुरी आदी मुख्य बाजारपेठ व मॉल येथे शेतकरी, नोकरदार व कामगार वर्गाकडून सोने, वाहन, कपडे, इलेक्ट्रॉनिकच्या विविध वस्तू व किराणा बाजारात मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे.
बहुतांश कामगार व नोकरदार वर्गांचा पगार अधिक बोनस आज, बुधवारी झाल्याने बाजारपेठेत सायंकाळी काही प्रमाणात गर्दी होती. (प्रतिनिधी)
स्मार्ट फोनची रेंज वाढली
यंदा अनेक प्रकारचे स्मार्ट फोन बाजारात आले आहेत. चिनी बनावटीसह अनेक ब्रँड बाजारात आले आहेत. किमतीही अगदी अडीच हजारांपासून लाखांपर्यंत आहेत. दिवाळी कॅश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे, हव्या त्या किमतीचे मोबाईल फोन बाजारात आणले आहेत.
- रवि भानुसे (स्वयंभू कम्युनिकेशन)


‘एलईडी’ची चलती
इलेक्ट्रॉनिक बाजारात सध्या एलईडी चलती आहे. साडेसात हजार ते तीन लाख रुपयांपर्यंतच्या एलईडींना ग्राहकांतून मोठी मागणी आहे. यंदाची दिवाळी कॅश करण्यासाठी कंपन्यांनी नवनवीन ओव्हन, फ्रिज, म्युझिक सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स सुर्इंग मशीनची नवी रेंजही बाजारात आणली आहे.
- कश्यप शहा (नॉव्हेल होम अ‍ॅप्लायन्सेस)

तयार फराळाला मागणी
नोकरदार महिलांना घरी वेळ नसल्याने फराळाचे जिन्नस तयार घेण्याकडे कल वाढला आहे. तयार पदार्थांमध्ये करंजी, लाडू, चकली, पुडाची वडी, बुंदीचे लाडू या पदार्थांना मोठी मागणी असते. किलोचे भाव अद्यापही ठरविलेले नाहीत. सध्या आॅर्डर घेण्याचे काम सुरू आहे.
- सुजाता भोसले (फराळ विक्रेत्या)

Web Title: Markets ready for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.