जयसिंगपूर,शिरोळमध्ये बाजारपेठा सजल्या;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:30 IST2021-09-04T04:30:00+5:302021-09-04T04:30:00+5:30
जयसिंगपूर / शिरोळ : जयसिंगपूर, शिरोळसह परिसरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध डेकोरेशनसह साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे गणपती ...

जयसिंगपूर,शिरोळमध्ये बाजारपेठा सजल्या;
जयसिंगपूर / शिरोळ : जयसिंगपूर, शिरोळसह परिसरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध डेकोरेशनसह साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे गणपती सजावटीचे व डेकोरेशन साहित्य खरेदी करण्यासाठी या स्टॉलकडे नागरिक आकर्षित होत आहेत. अवघ्या सात दिवसांवरच श्रींचे आगमन होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी भाविकांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. महापुराचे दु:ख विसरून शिरोळ तालुका पूर्वपदावर येत असला तरी येणारा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तरुण मंडळे याचबरोबर मूर्ती तयार करणाऱ्यांकडून नियोजन केले जात आहे. जयसिंगपूर, शिरोळ बाजारपेठेत गौरी-गणपती सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. विविध ठिकाणी गणेशमूर्ती त्याचबरोबर सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. घरगुती व सार्वजनिक मंडळांकडून श्रींच्या मूर्तींचे बुकिंग केले जात आहे.
फोटो - ०३०९२०२१-जेएवाय-०५, ०६
फोटो ओळ - शिरोळ बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डेकोरेशनसह विविध साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)