बाजार समिती दोन्ही गाड्यांची विक्री करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:15+5:302021-01-08T05:20:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींसाठी असलेल्या गाड्यांची विक्री करण्याचा निर्णय अशासकीय ...

The market committee will sell both the vehicles | बाजार समिती दोन्ही गाड्यांची विक्री करणार

बाजार समिती दोन्ही गाड्यांची विक्री करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींसाठी असलेल्या गाड्यांची विक्री करण्याचा निर्णय अशासकीय मंडळाने घेतला आहे. गांडूळ प्रकल्पासह इतर उत्पन्न वाढीसाठी निर्णयही घेण्यात आले.

बाजार समितीच्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्यानंतर अशासकीय मंडळ कार्यरत झाले. त्यांनी सभापती व उपसभापतींसाठी असलेली गाडी न वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेले चार महिने त्या गॅरेजला पडून आहेत, त्यांचा वापर होत नसल्याने गाड्या विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर समितीमध्ये भाजीपाल्यासह इतर शेतीमालाचा कचरा असतो, त्यापासून गांडूळ प्रकल्प राबवला जाणार आहे.

समितीमधील धान्य मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून रितसर सेस गोळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला. समितीमधील कचरा उठावासाठी प्रत्येक दिवसाला २२०० रुपयेनुसार टेंडर दिले होते. त्याऐवजी आता १८०० रुपयेने देण्याचा निर्णय घेतला आहे.

३७ कर्मचारी कायम होणार

समितीच्या २०१० ते २०१५ हा कालावधी असणाऱ्या संचालक व नेत्यांनी ३७ कर्मचाऱ्यांची जंबो भरती केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना कायम करण्याचा निर्णय अशासकीय मंडळाने घेतला. मात्र मागील संचालक मंडळाने भरती केलेल्या २९ कर्मचाऱ्यांबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही.

Web Title: The market committee will sell both the vehicles