शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 21, 2023 17:45 IST

कुणबी नोंदी असलेल्यांचाच अधिकार

कोल्हापूर : आपल्या देशात जातीनिहाय आरक्षण दिले जाते, मराठा समाज क्षुद्र नाही, त्यामुळे सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवून आरक्षण देण्याची गरज नाही, कुणबी नोंदी सापडतील ते ओबीसी आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहीजे असे परखड श्रमिक मुक्तीदलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी गुरुवारी मांडले.कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सरसकट आणि टिकणारे आरक्षण ही बोगस चर्चा आहे. मराठ्यांना ओढून ताणून मागासलेले दाखवून आरक्षण देऊ नका. श्रमिक मुक्ती दलाच्या अधिवेशनात राज्यातील सात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व ठराव केले जाणार आहेत. त्यापैकी मराठा आरक्षण हा एक महत्वाचा विषय आहे.कुणबी, माळी आणि धनगर हे तीन भाऊ आहेत. पण मराठे क्षुद्र नव्हते, कुणबी क्षुद्र आहेत, १८८१ साली जिल्ह्यात २ लाख ९९ हजार ८७१ कुणबी व ६२ हजार २८७ मराठे होते. कुणबी नोंदी असलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहीजे पण सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवून त्यांच्यासाठी वेगळा कायदा करण्याची, आरक्षणाची गरज नाही.

इतिहास बदलण्याचा प्रयत्नते म्हणाले, राज्यकर्त्यांकडून इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे. त्यांना बुद्धांना हद्दपार करायचा आहे, शिवाजी महाराजांचा नवा इतिहास लिहायचा आहे, मनुस्मृती पून्हा आणायची आहे. पौराणिक कथा म्हणजे इतिहास हे बिंबवले जात आहे. शिलालेख, कागदपत्रे, तत्कालीन दस्ताऐवज त्यांच्यासाठी महत्वाचे नाही. हे असेच करत शिकलेल्या तरुणाईच्या कानात शिसे ओतले जात आहे. शाहु, फुले आ्बेडकरांचे विचार मातीमोल करून जातीव्यवस्थेची उतरंड परत आणणे म्हणून समाजाने पुन्हा गुलामीत जाण्यासारखे आहे.

भिक्षा नको पाणी द्याते म्हणाले, शासनाचा आनंदाचा शिधा, मोफत धान्य म्हणजे भिक्षाच आहे. शेतकऱ्यांना ही भिक्षा नको पाणी द्या, वीज द्या, रोजगाराच्या संधी द्या. पण सरकार भांडवलदारांना सवलती आणि आम्हाला भिक्षा देत आहे. म्हणजे भांडवलदारांची हमाली करा किंवा कंपन्या म्हणतील तसे गुलाम व्हा असा पर्याय ठेवला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण