शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Maratha reservation- आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी घातले दंडवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 17:50 IST

मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगित दिल्याने संतप्त झालेल्या येथील उत्तेश्वर पेठेतील कार्यकर्त्यांनी दंडवत घालत अंबाबाई मंदिराकडे जाण्याचा शुक्रवारी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पुढे होत दंडवत घालायला सुरूवात केली. अखेर पोलिसांनी त्यांनाही रोखले. उत्तेश्वर पेठेतच हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.

ठळक मुद्देआंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी घातले दंडवतमराठा आरक्षणासाठी आंदोलन

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगित दिल्याने संतप्त झालेल्या येथील उत्तेश्वर पेठेतील कार्यकर्त्यांनी दंडवत घालत अंबाबाई मंदिराकडे जाण्याचा शुक्रवारी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पुढे होत दंडवत घालायला सुरूवात केली. अखेर पोलिसांनी त्यांनाही रोखले. उत्तेश्वर पेठेतच हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर उत्तेश्वर पेठ येथील कार्यकर्त्यांनी उत्तरेश्वर मंदिर ते अंबाबाई मंदिर या मार्गावर दंडवत घालण्याचे आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार सकाळी हे आंदोलन सुरूही करण्यात आले. काही अंतर घोषणा देत हे कार्यकर्ते चालत निघाल्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेउन व्हॅनमध्ये बसवले.

यावेळी सोबत असलेल्या शालेय गणेशातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीही रस्त्यावर दंडवत घालायला सुरूवात केली. अखेर पोलिसांनीच या विद्यार्थ्यांना दंडवत घालणे थांबवायला सांगितले आणि त्यांना उठवले. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने आमच्या समाजातील मुलामुलींना शिक्षण घेणेही अवघड बनले आहे. यासाठीच आम्ही हे आंदोलन करत होतो अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत -संभाजीराजे छत्रपतीयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमच्या भविष्याचे काय? या विध्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, अशी मागणी केली आहे.. समाज माध्यमावरील आंदोलनाचे फोटो ट्विट करून राजेंनी हे छायाचित्र मराठा समाजातील खदखदीचे प्रतिनिधित्व करते, अशी प्रतिक्रिया दिली. समाजाचा आक्रोश बळाचा वापर करुन शमवण्याचा प्रयत्न कराल, तर तो तितकाच तो उफाळून येईल. म्हणून मी सरकारला सांगू इच्छितो की आपण आंदोलकांच्या आक्रोशाचा सन्मान करा. यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे की, आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत, त्यांना नोटिसा देऊ नयेत, हे केल्यास त्याचा उलट परिणाम दिसून येईल, असे  संभाजीराजे म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणStudentविद्यार्थीPoliceपोलिसSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर