शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation ...अन्यथा मराठाच निवडणुकीत तुमचा अंत करेल; हर्षवर्धन पाटील यांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:50 IST

काँग्रेसने सत्तेत असतानाच मराठा आरक्षणाबाबत वटहुकूम काढून घेतलेल्या निर्णयाचाच अध्यादेश भाजप सरकारने काढावा, असेही आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकोल्हापुरातील मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनास पाठिंबाआरक्षणाचा वटहुकूम आम्हीच काढला; आता तुम्ही अध्यादेश काढा

कोल्हापूर : मराठा समाज हा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सरकारने त्याचा अंत पाहू नये; अन्यथा हाच समाज निवडणुकीत तुमचा अंत करील, असा इशारा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सरकारला दिला. काँग्रेसने सत्तेत असतानाच मराठा आरक्षणाबाबत वटहुकूम काढून घेतलेल्या निर्णयाचाच अध्यादेश भाजप सरकारने काढावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी कोल्हापुरात दसरा चौकात गेले अकरा दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. शनिवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवून पाठिंबा व्यक्त केला, त्याप्रसंगी ते बोलत होते.माजी मंत्री पाटील म्हणाले, मी कोल्हापूरचा पालकमंत्री असताना दहा वर्षांत कधीही कोणाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही सत्तेत असताना मराठा आरक्षणाबाबतचा वटहुकूम काढला; पण त्यासाठी इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही. महाराष्ट्रात  गरीब शेतकरी वर्ग आहे, आम्ही श्रीमंत वर्गासाठी आरक्षण मागत नाही. गरिबांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या.सर्व मराठा समाज आज रस्त्यावर उतरत आहे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा जनताच येत्या निवडणुकीत तुमचा अंत करील, असाही इशारा यावेळी माजी मंत्री पाटील यांनी दिला. यावेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, आदी उपस्थित होते.शाहू महाराजांचे अभिनंदनशाहू महाराज हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी गेले नसल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. आता कोणतेही शिष्टमंडळ आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेला येणार नसल्याचे सांगून प्रथम मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढा; मगच आम्ही आंदोलन मागे घेऊ, असेही ते म्हणाले.मग विरोध कोणाचा?सध्या मराठा समाज भडकला असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आरक्षण देण्याबाबत कटिबद्ध असल्याचे सांगतात; तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वचनबद्ध असल्याचे बोलतात. मग आरक्षणाला विरोध कोणाचा? असाही प्रश्न करून सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण मंजूर करून प्रश्न निकाली काढावा, असे सुनावले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर