गडहिंग्लज : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली १६ जूनला कोल्हापूर येथील राजर्षि छ.शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.गडहिंग्लज शहरातील यशवंत बझारच्या सभागृहात ही पार पडली. अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम होते. छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली लढाई 'आर या पार'ची असून आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचे नाही, असा ठराव यावेळी करण्यात आला.१६ जूनला सकाळी ९ वाजता येथील एम. आर. हायस्कूल समोरील यशवंत बझार येथे सर्वांनी जमायचे आहे.त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून कोल्हापूरकडे कूच करण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.यावेळी भाजपाचे चंद्रकांत सावंत, काँग्रेसचे दिग्विजय कुराडे, शिवसेनेचे दिलिप माने,मनसेचे नागेश चौगुले वआप्पा शिवणे यांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीस मराठा मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.शिवाजीराव भुकेले, केदारी रेडेकर संस्था समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, रामचंद्र शिवणे,प्रा. यशवंत कोले, किरण डोमणे, प्रकाश पोवार, संजय पाटील, युवराज बरगे, प्रताप सरदेसाई, मनोज पोवार,उत्तम देसाई आदी उपस्थित होते.
Maratha Reservation : कोल्हापूरच्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:38 IST
Maratha Reservation Kolhapur : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली १६ जूनला कोल्हापूर येथील राजर्षि छ.शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.
Maratha Reservation : कोल्हापूरच्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार !
ठळक मुद्देकोल्हापूरच्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार !मराठा आरक्षण : गडहिंग्लजला सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्धार