शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

Maratha Reservation : शासनास ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’,  निर्णय घ्या, अन्थथा शासन जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:01 IST

मराठा आरक्षण मागणीसाठी कोल्हापूरात दसरा चौकात सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठींबा वाढत आहे. या प्रश्नासाठी बलीदान दिलेल्या शाहिदांच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक रुपया बचत करावे असे आवाहन या ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरुन गुरुवारी केले.

ठळक मुद्देशासनास ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’,  निर्णय घ्या, अन्थथा शासन जबाबदारमराठा आरक्षण मागणीसाठी ठिय्या आंदोलनास वाढता पाठींबा

कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी कोल्हापूरात दसरा चौकात सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठींबा वाढत आहे. या प्रश्नासाठी बलीदान दिलेल्या शाहिदांच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक रुपया बचत करावे असे आवाहन या ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरुन गुरुवारी केले. दरम्यान, शासनाने हा प्रश्न तातडीने निकाली काढावा अन्यथा ९ आॅगष्ट रोजी महाराष्ट्र बंद कालावधीत घडणाऱ्या संभाव्या परिस्थितीस शासनच जबाबदार राहील असाही इशारा देण्यात आला.कोल्हापूरातील दसरा चौकात गेले नऊ दिवस सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरु आहे. अनेक नेत्यांनी या व्यासपीठावर येऊन मराठा आरक्षणाला पाटबळ दिले. आंदोलनाला विवीध पक्ष, संघटनांचा पाठींबा वाढत आहे. गावांगावांतून युवक भगव्या टोप्या परिधान करुन भगवे झेंडे फडफडत दुचाकी रॅलीने दसरा चौकात येऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत. दिवसभर ‘जय भवानी-जय शिवाजी, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे’ असे नारा दसरा चौकात घुमत आहे.गुरुवारी आंदोलनस्थळी नेत्यांनी भाषणे करताना शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा यासाठी ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’ देण्यात आला. ९ आॅगष्ट रोजी अगर त्यानंतरच्या संभाव्या परिस्थितीस शासनच जबाबदार राहील असाही इशारा दिला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रत बलीदान दिलेल्या चौघांच्या नातेवाईकांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनाही अर्थसहाय्य करावे अशीही मागणी काहींनी भाषणातून केली.

राजकिय बोक्यांना बाजूला सारा : धैयशील मानेजिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, आरक्षणाची धग वाढताना शासनाने वेळीच तोडगा काढवा अन्यथा त्याचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. ९ आॅगष्ट रोजी महाराष्ट्र बंद वेळीही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यावेळी घडणाऱ्या घटनेस शासनच जबाबदार राहील असा इशारा देत माने म्हणाले, आम्हाला राजकिय आरक्षण नको, अन्यथा आतापर्यत झालेले मराठा समाजातील मुख्यमंत्रीच ते आरक्षण लाटतील, अशा राजकिय बोक्यांना प्रथम बाजूला सारा. त्यामुळे आम्हाला फक्त शैक्षणिक व नोकरीतच आरक्षण द्यावे.

आरक्षणातील शहिदांसाठी १ रुपये बचत करामराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलीदान दिलेल्या चौघांच्या नातेवाईकांची अवस्था दयनीय झाली असून त्यांना अर्थसहाय्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक आंदोलनस्थळी एक बॉक्स ठेवून त्यात प्रत्येक आंदोलकाने किमान १ रुपये टाकावा, त्यातून जमा होणारी रक्कम ही सर्वासमक्ष खोलून ती बलीदान झालेल्या शहिदांच्या नातेवाईकांना द्यावी असाही प्रस्ताव माजी आमदार सुरेश साळोखे यांनी मांडला.

गावातील भगव्या रॅली दसरा चौकातमुडशिंगी, मोरेवाडी, दऱ्याचे वडगाव येथील युवकांनी दुचाकीवरुन रॅली काढून दसरा चौकात येऊन आंदोलन केले. पाचगाव येथील नागरीकांनीही पदयात्रा काढत दसरा चौकात येऊन आंदोलनाला पाठींबा दर्शवला. त्यामुळे गावागावातील भगवे जथ्ये कोल्हापूरात दाखल होत होते.

काँग्रेसच्या नगरसेवकांचाही ठिय्यामहापालिकेतील काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनीही गुरुवारी दसरा चौकात ठिय्या आंदोलनात सहभाग दर्शविला. यामध्ये गटनेते शारंगधर देशमुख, राहूल माने, संजय मोहिते, भूपाल शेटे, प्रविण केसरकर, इंद्रजीत बोंद्रे, सचीन चव्हाण यांच्यासह अशकीन आजरेकर, दुर्वास कदम आदी सहभागी झाले.

आंदोलकांची आडवणूक नाही: पोलीस अधीक्षकसेनापती कापशी येथून पायी कोल्हापूरात येणाऱ्या आंदोलकांची कोगनोळी नाक्याजवळ पोलिसांनी आडवणूक केल्याची माहिती दसरा चौकात मिळाल्याने आंदोलक संतप्त झाले. पण पायी येणाऱ्या आंदोलकांची कर्नाटक पोलिसांच्या तावडीतून आपण सुटका केली. त्यांना सुखरुप कागलपर्यत आणले असून ते शुक्रवारी सकाळी दसरा चौकात पोहचतील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी व्यासपीठावर भाषणातूनच केल्याने अनेकांनी सुस्कार सोडला.

जनता दल, हिंदू एकतांचाही पाठींबाजनता दल (सेक्युलर) या पक्षानेही आंदोलनाला पाठींबा दिला. महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी, शासनाने तातडीने मराठा आरक्षणाचा त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा भविष्यातील अस्थिर परिस्थितीस शासनच जबाबदार राहील असाही इशारा दिला.

आंदोलनात विठ्ठलराव खोराटे, वसंतराव पाटील, विठ्ठलराव मुसळे, संभाजीराव पाटील, एस.डी.पाटील, बबन पाटील, शरद पाटील आदी सहभागी झाले. तर हिंदू एकता आंदोलनतर्फे आंदोलनात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, लाला गायकवाड, हिंदूराव शेळके, शांतारावम इंगवले, जयदिप शेळके, आण्णा पोतदार आदी सहभागी होते.

विवीध समाज, संघटनेचा पाठींबावीरशैव कक्कय (डोहर) समाज व चर्मकार समाज कृती समिती (दुर्वास कदम, निरंजन कदम, संतोष भिसूरे), समस्त जैन समाज (श्री लक्ष्मीसेन भट्टारक महाराज), माजी सैनिक संघटना कागल, जंगम पुरोहित सेवा संस्था (संतोष स्वामी), तुळजाभवानी गृहनिर्माण संस्था,आदी संघटनांनी पाठींबा व्यक्त केला.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर