शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सकल मराठा समाजातर्फे कोल्हापुरात उद्यापासून साखळी उपोषण, अंतरवाली सराटी गावाला देणार भेट

By संदीप आडनाईक | Updated: October 28, 2023 15:57 IST

जिल्ह्यातील प्रत्येक गावी मराठा आरक्षण निर्धार यात्रा काढण्यात येणार

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कोल्हापूर सकल मराठा समाजातर्फे उद्या, रविवार, दि. २९ ऑक्टोबरपासून रोज सकाळी १०.३० ते १ या वेळेत दसरा चौकातील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याशेजारी रोज साखळी उपोषण करण्यात येणार आहे.जरांगे पाटील यांने केलेल्या आवाहनानुसार सकल मराठा समाजाने मंत्र्यांना गावबंदी सुरु केली आहे. ती यापुढेही सुरु राहणार आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दसरा चौकात मंडप उभारण्यात आला आहे. या साखळी उपाषणादरम्यान मराठा समाजाचे आरक्षणासंदर्भात प्रबोधनही करण्यात येणार आहे.या आठवड्यात कोल्हापूरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते अंतरवाली सराटी गावे म्हणजेच जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणस्थळाला भेट देउन त्यांना पाठिंबा व्यक्त करणार आहेत. यावेळी त्यांच्याशी आरक्षणाविषयी कायदेशीर बाबींची चर्चाही करण्यात येईल असे ॲड. बाबा इंदूलकर यांनी सांगितले. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावी मराठा आरक्षण निर्धार यात्रा काढण्यात येणार असल्याचेही इंदूलकर यांनी सांगितले.या उपोषणात ॲड. इंदूलकर यांच्यासह बाबा पार्टे, दिलिप देसाई, विजय देवणे, रविकिरण इंगवले, अनिल घाटगे, चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील, अमर निंबाळकर, ॲड. सतिश नलावडे, अमित अतिग्रे, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

१४ गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीमनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील १४ गावांमध्ये सर्व राजकीय नेत्यांना प्रवेशास बंदी जाहीर केली आहे. या गावांमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आमदार, खासदार तसेच मंत्र्यांना गावात न येण्याबाबत इशारा दिलेला आहे. या गावात प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. ही आहेत प्रवेशबंदीची गावेयामध्ये खिंडव्हरवडे (ता.राधानगरी), निठूर (ता. चंदगड), रेठरे वारणा (ता.शाहूवाडी), आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी), हळदवडे आणि एकोंडी (ता. कागल), दिंडनेर्ली, इस्पुर्ली, नांदगाव, नागाव, चुये, येवती, हणबरवाडी, म्हाळुंगे आणि पाडळी खुर्द (ता.करवीर).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण