शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलन: कोल्हापूर परिक्षेत्रात १२ गुन्हे दाखल, आंदोलकांकडून एसटी लक्ष्य 

By उद्धव गोडसे | Updated: November 1, 2023 16:53 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून, कोल्हापूर परिक्षेत्रातही आंदोलन तापले आहे. गेल्या ...

कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून, कोल्हापूर परिक्षेत्रातही आंदोलन तापले आहे. गेल्या चार दिवसात परिक्षेत्रातील सोलापूर ग्रामीण हद्दीत ११ ठिकाणी एसटींची तोडफोड झाली, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एका एसटीची तोडफोड झाली. तोडफोडीच्या सर्व गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पटली असून, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.मराठा आरक्षण आंदोलनात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथील पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आंदोलकांच्या संपर्कात आहेत. उपोषण, मोर्चे, निदर्शने, कॅण्डल मार्च, रास्ता रोको, नेत्यांना गावबंदी करणे अशा घडामोडींवर पोलिसांची नजर आहे. आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या दौ-यांमध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी वाढीव बंदोबस्त पुरवण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी सर्व पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयांबाहेरही बंदोबस्त तैनात केला आहे. क-हाड, तासगाव येथील मोर्चे आणि सातारा जिल्हा बंद शांततेत पार पाडण्यात पोलिसांना यश आले.आंदोलनांमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवरील वाहतूक खंडित होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होऊ नये यासाठी संवेदनशील परिसरात एसटीच्या काही फे-या रद्द करण्याचे आवाहन पोलिसांनी एसटी महामंडळास केले आहे. गेल्या चार दिवसात सोलापूर ग्रामीण परिसरात ११ ठिकाणी एसटींची तोडफोड झाली. शिरोळ येथेही एका एसटीवर दगडफेक झाली. सर्व १२ गुन्हे दाखल झाले असून, दगडफेक करणा-या संशयितांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण