शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

मराठा समाजाचा डिसेंबरचा अल्टिमेटम; ओबीसी कोट्यातूनच आरक्षणासाठी समाज आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 09:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी आरक्षण द्यावे, अन्यथा सन २०२४च्या निवडणुकीत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी आरक्षण द्यावे, अन्यथा सन २०२४च्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारला जागा दाखवू, असा सडेतोड इशारा बुधवारी सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनावेळी दिला. 

यावेळी आमदार जयश्री जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते क्रांतिदिनी आरक्षण लढ्याची मशाल पुन्हा पेटवण्यात आली. आमदार जाधव म्हणाल्या, जोपर्यंत सरकारचे डोळे उघडणार नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. आता आम्ही शांत बसणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या नावे सात कोटी अर्ज nमराठा समाजाचे आरक्षण टिकायचे असेल तर ते पन्नास टक्क्यांच्या आतच असले पाहिजे. यामुळे ओबीसी कोट्यात चुकीच्या पद्धतीने घालण्यात आलेल्या जाती वगळणे आवश्यक आहेत. nमुख्यमंत्र्यांनी मराठा राज्य मागासवर्ग आयोग कायदा २००५चे कलम ११ अंमलबजावणी करावी, ओबीसी यादीचे पुनरीक्षण करावे, इतर मागासवर्ग राहिले नसलेल्यांना यादीतून वगळावे. nअप्रगत मराठा समाजाला ३१ डिसेंबरपूर्वी ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशा आशयाची सात कोटी पत्रे राज्यभरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येणार आहेत.

‘विस्थापित’ मराठ्यांच्या मोर्चाकडे प्रस्थापितांची पाठ

छत्रपती संभाजीनगर :  शिक्षणासाठी शहरात आलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर क्रांती दिनी बुधवारी मोर्चा काढला. या मोर्चाकडे मराठा समाजातील प्रस्थापितांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देतात. यामुळे मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण