शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

..तर राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक

By संदीप आडनाईक | Updated: September 2, 2023 16:00 IST

मराठा समाजाची मुले जर नक्षली झाली तर त्याला सरकार जबाबदार, छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने

कोल्हापूर : मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा सकल मराठा समाजातर्फे आज, शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या फीती लावून निदर्शने करण्यात आली. मराठा समाजाची मुले जर नक्षली झाली तर त्याला सरकार जबाबदार राहील, राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.जालना येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर खाली डोके वर पाय, एक मराठा, लाख मराठा  अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. दंडावर काळ्या फीती लाउन शिवाजी चौकात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.मराठा समाज मतदानावर बहिष्कार टाकेल, स्वत:ची व्होट बँक तयार करेल अशी माहिती बाळ घाटगे यांनी दिली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या जालन्यात आहेत. ते कोल्हापूरात आल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरेल अशी माहिती राजू सावंत यांनी दिली.या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, राजमाता जिजाउ ब्रिगेड आदी संघटना सहभागी झाल्या  होत्या. यावेळी बाळ घाटगे, राजू सावंत, चंद्रकांत पाटील, किशोर घाटगे, विनायक पोवार, प्रकाश पाटील, संजय पवार, हणमंत पाटील, उदय लाड, पांडुरंग दिवसे, अरुण काशीद, जगदीश शेळके, सुनीता पाटील, छाया जाधव, लता जगताप, सुवर्णा मिठारी, सुधा सरनाईक, माई वाडेकर, रेश्मा पवार, भारती दिवसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिस