मराठा समाजाला ईडब्लूएसचा दाखला मिळाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:53+5:302021-06-09T04:30:53+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारने मराठा समाजाला लागू केलेले ईडब्लूएसच्या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी हे दाखले निघेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करू ...

मराठा समाजाला ईडब्लूएसचा दाखला मिळाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया नको
कोल्हापूर : राज्य सरकारने मराठा समाजाला लागू केलेले ईडब्लूएसच्या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी हे दाखले निघेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी जनसंघर्ष सेनेने मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जनसंघर्ष सेनेचे अध्यक्ष शुभम शिरहट्टी, अजिंक्य गोसावी, संदेश पोलादे, सोहम कुऱ्हाडे, साहिल भाट, राजनिश चौगले यांनी हे निवेदन देऊन यात तोडगा काढण्याची विनंती केली आहे. आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी दाखला महत्त्वाचा आहे. सध्या कोविडमुळे शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. त्यामुळे दाखला काढायचा म्हटला तरी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दाखल्यांच्या संदर्भात वेबसाइटवरून माहिती द्यावी, दाखले मिळेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.