अनेकांना थुंकी लावली पुसायला, अँटी स्पिटिंग मूव्हमेंटचा वचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:28 IST2021-09-07T04:28:59+5:302021-09-07T04:28:59+5:30

थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीमार्फत ‘माझी थुंकी, माझी जबाबदारी..आता बनवायचे कोल्हापूर आरोग्यदायी’ या संकल्पनेनुसार राबविण्यात येत असलेल्या मोहिमेने व्यापक रुप घेतले ...

Many spit it out, whispering anti-spitting movement | अनेकांना थुंकी लावली पुसायला, अँटी स्पिटिंग मूव्हमेंटचा वचक

अनेकांना थुंकी लावली पुसायला, अँटी स्पिटिंग मूव्हमेंटचा वचक

थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीमार्फत ‘माझी थुंकी, माझी जबाबदारी..आता बनवायचे कोल्हापूर आरोग्यदायी’ या संकल्पनेनुसार राबविण्यात येत असलेल्या मोहिमेने व्यापक रुप घेतले आहे. कार्यकर्त्यांनी एकाच दिवसात चौकाचौकांत उभे राहून अनेक थुंकीचंदाना त्यांनी थुंकलेली थुंकी पुसायला लावली, तसेच यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही, समाजाचे आरोग्य बिघडवणार नाही अशी शपथ घ्यायला लावली.

यात पहिल्या दिवशी ज्यांनी शपथ घेण्यास टाळाटाळ केली, त्यांना शोधून त्यांच्याकडून पुन्हा दुसऱ्या दिवशी शपथ घेण्यात आली. यामुळे आता थुंकीवीरांमध्ये वचक निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गेल्या दीड वर्षापासून ही लोकचळवळ कोल्हापुरातून सक्रिय झाली आहे. यामध्ये कार्यकर्ते सोशल मीडियाशिवाय प्रत्यक्ष रस्त्यावर चौकाचौकांत लोकांचे प्रबोधन करत आहे. याशिवाय जनजागृतीसाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी थुंकणे विरोधी होर्डिंग्ज लावत आहे.

या मोहिमेत विजय धर्माधिकारी, राहुल राजशेखर, दीपा शिपूरकर, सारिका बकरे, सागर बकरे, अभिजित रोटे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्मार्ट सिटीचे महेश ढवळे, उदय दीक्षित, तुषार शिरगुप्पे यांनी भाग घेतला. या उपक्रमात चळवळीतील इतर कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

कोट

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे किती वाईट आहे, हे अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही. यासाठी जनजागृतीसह वचक निर्माण होणे गरजेचे आहे. सरकारने यात शासन निर्णय जारी केला असला, तरी प्रत्यक्षात प्रशासनाकडून मात्र अजूनही ठोस कारवाई होताना दिसत नाही.

-दीपा शिपूरकर,

अँटी स्पिटिंग मूव्हमेंट, कोल्हापूर.

------------------------------------

फोटो : 06092021-kol-Antispit movement

फोटो ओळी : कोल्हापूरात अँटी स्पिटिंग मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी एकाच दिवसात शहरातील चौकाचौकांत मोहीम राबवून विनाकारण रस्त्यावर थुंकणाऱ्यांना थुंकी पुसायला लावली.

060921\06kol_3_06092021_5.jpg

फोटो : 06092021-kol-Antispit movementफोटो ओळी : कोल्हापूरात अँटी स्पिटिंग मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी एकाच दिवसात शहरातील चौकाचौकात मोहीम राबवून विनाकारण रस्त्यावर थुंकणाऱ्यांना थुंकी पुसायला लावली.

Web Title: Many spit it out, whispering anti-spitting movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.