करिअर करण्यासाठी अनेक पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:38+5:302021-09-09T04:29:38+5:30
राशिवडे : करिअर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आता पालकांनी पाल्यासह करिअरबाबतीत साक्षर होणे गरजेचे आहे. भविष्यातील दिशा ठरविताना ...

करिअर करण्यासाठी अनेक पर्याय
राशिवडे : करिअर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आता पालकांनी पाल्यासह करिअरबाबतीत साक्षर होणे गरजेचे आहे. भविष्यातील दिशा ठरविताना विद्यार्थ्यांच्या गुणांचा आणि त्यांच्या आवडीचा विचार करून पालकांनी निर्णय घ्यावेत, असे प्रतिपादन एज्यू जिनीयस अकॅडमी, कोल्हापूरचे संचालक व्ही. एस. भोसले यांनी केले. बुधवारी शिक्षक दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील होते.
येळवडे (ता. राधानगरी) येथील श्रीमान छत्रपती शैक्षणिक व क्रीडा अकादमी संचलित रेडिएंट अकॅडमीच्या वतीने आज एनएमएमएस, ऑलंपियाडसह विविध परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक शिक्षकांचेही गौरव झाले. याप्रसंगी रेडिएंटचे संस्थापक व व्यवस्थापक आर. जी. पाटील यांनी अकॅडमीच्या माध्यमातून सर्वांगीण शिक्षणाचे दालन खुले करणार असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित राष्ट्रीय जलतरणपटू पंडित पांडे, करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय भोसले, संग्रामसिंह पाटील, रंगराव बरगे, पत्रकार राजू घाटगे, नरेंद्र नकाते, सतीश मळगे, सीएससीचे सूरज गायकवाड, प्रा. बी. एस. लाड यांच्या हस्ते शिक्षक व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. आर. आर. पाटील, शैलेश पाटील, अजित सरवळकर, सौ. एम. ए. जोंग, वीरेंद्र पाटील यांनी संयोजन केले. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. श्री. पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळी : रेडिएंट अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करताना विष्णू भोसले, राजेंद्र पाटील, आर. जी. पाटील, पंडित पांडे, विजय भोसले, आदी उपस्थित होते.